Saturday, January 28, 2023
HomeAnimal Husbandryमाध्यमांनो, बर्ड फ्लूवर शास्त्रोक्त बोला की काही..!

माध्यमांनो, बर्ड फ्लूवर शास्त्रोक्त बोला की काही..!

किसानवाणी :
आजकाल कुठलाही आजार आला की सर्वप्रथम त्याच्यावर शास्त्रोक्त वैज्ञानिक चर्चा न करता जास्तीत जास्त नागरिकांना भीती दाखवण्याची माध्यमांत चढाओढ लागलेली असते का असा प्रश्न पडतो. त्यामुळे आपली जबाबदारी वाढते की त्यातल्या वैज्ञानिक गोष्टी स्पष्टपणे समाजापुढे मांडणे.

दोन दिवसांपासून बर्डफ्लू च्या वार्ता सर्व प्रमुख वृत्तपत्रे आणि अनेक वाहिन्यांच्या ब्रेकिंग न्युज झाल्यात. मराठवाड्यातील परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यात या रोगाचे संक्रमण झाल्याचे अहवाल आले आहेत. बर्डफ्लू हा विषाणूजन्य आजार असून याचा प्रादुर्भाव H5N1 या विषाणूमुळे होतो. (H5- Hemagglutinin  type5  & Neuramidinase type-1) हि ह्या विषाणूची प्रथिनांवरील संरचना आहे. ह्या विषाणूला Avian influenza असेही म्हणतात.  सर्वप्रथम १९९६ साली चीनमध्ये गीज (बदकासारखी कोंबडी) या पक्षामध्ये, तर माणसांमध्ये १९९७ साली हॉंगकॉंग या देशात हा विषाणू आढळून आला. आतापर्यंत ५० हुन जास्त देशांमध्ये या विषाणूचे संक्रमण आढळून आलेले आहे.

ज्या पक्षांमध्ये संक्रमण झाले आहे, त्या पक्ष्यांची विष्टा आणि लाळेमध्ये हा विषाणू ८-१० दिवस जिवंत राहतो. आणि त्यामुळे याचा प्रसार आणि प्रादुर्भाव हवेतून आणि संपर्कातून जास्त होतो. पक्षांच्या तुलनेत माणसांमध्ये संक्रमणाचे प्रमाण अत्यल्प आहे. महाराष्ट्र गेल्या १५ वर्षांत अनेक वेळा या आजाराची साथ येऊन १००० पेक्षा कमी जणांना याची बाधा झाली असून याचा मृत्युदर ६०% आहे.

लक्षणे:-  खोकला, ताप, श्वसनाचा त्रास.
उपाययोजना:-
१) चिकन, अंडी आणि मांस हे शिजवूनच खावेत. (७० डिग्री पेक्षा जास्त तापमानात हा विषाणू जिवंत राहत नाही).
२) आपल्या घरातील पाळीव पक्षी बाहेर सोडू नयेत, त्यांना जागेवरच खाद्य आणि पाणी द्यावे.
३) कुक्कुटपालन क्षेत्रातील कामगारांनी स्वतःची जास्त काळजी घ्यावी.

लेखक : संदीप वाघ,
संशोधक विद्यार्थी, जीवरसायनशास्त्र विभाग,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.
News Source : कृषिरंग

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments