Homeबातमी शेतीचीमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - निधी वितरणाबाबत महत्वाची बातमी

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – निधी वितरणाबाबत महत्वाची बातमी

किसानवाणी :
महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सन २०२०-२१ साठी ७ हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्यातून यापूर्वी वितरित निधी वगळता २ हजार ३३४ कोटी रूपये वितरित करण्यास मान्यता दिल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांचे अधिनस्त सहायक निबंधक (अंदाज व नियोजन), सहकार आयुक्त कार्यालय, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. दि. १ एप्रिल २०१५ ते दि. ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या, तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ही कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती. 

या योजनेची अंमलबजावणी सुरू असतांना देशासह राज्यात कोविड-१९ चे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments