Homeबातमी शेतीचीहोय... अंड्यांची गुणवत्ता वाढ आणि खाद्य बचतीसाठी कोंबड्यांना द्या 'ही' फुले!

होय… अंड्यांची गुणवत्ता वाढ आणि खाद्य बचतीसाठी कोंबड्यांना द्या ‘ही’ फुले!

किसानवाणी | पोल्ट्री व्यावसायिक सध्या अडचणींचा सामना करत असून कोंबड्यांच्या खाद्याचा खर्च अनेक कुकुटपालकांना परवडेनासा झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आसाममधील कृषी विज्ञान केंद्राने कोंबड्यांसाठी खाद्य करण्याची नवीन पद्धत शोधली आहे. झेंडूच्या फूलांपासून खाद्य निर्मिती केली जाऊ शकते असा शोध कृषी विज्ञान केंद्राने लावला आहे.

जनावरे पाळताना पशुपालकांसमोर पहिला प्रश्न येत असतो तो म्हणजे चारा -पाण्याचा. कुक्कुटपालन करणारे असो की पशुंचे पालन करणारे प्रत्येक शेतकऱ्यांला आधीच चाऱ्याची सोय करुन ठेवावी लागते. पोल्ट्रीवाल्यांना तर कधी – कधी कोंबड्यासाठी खाद्य आणण्यासाठी मोठ्या अडचणी भेडसावतात. हातात पैसा नसला तर पिल्लांना खाद्य काय द्यावे याची चिंता सतावते. अशातच बर्ड फ्लू , कोरोना यासारख्या संकटामुळे पोल्ट्री व्यवसायिकांचे कंबरडेचं मोडले आहे. अनेक पोल्ट्री धारकांचा माल पडून राहिल्याने पैसा गुंतल्याने खाद्य घेण्यासही हाती पैसा उरलेला नाही.

ही परिस्थीती ध्यानात घेत आसाममधील कृषी विज्ञान केंद्राने कोंबड्यांसाठी खाद्य करण्याची नवीन पद्धत शोधली आहे. झेंडूच्या फूलांपासून खाद्य निर्मिती केली जाऊ शकते असा शोध त्यांनी लावला आहे. आसाम मधील कामरुप जिल्ह्यात झेंडुच्या फुलांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु यावेळी फुलांची विक्री झाली नाही. त्यामुळे येथील कृषी विज्ञान केंद्राने कोंबड्यांना झेंडुची फुले खाऊ घाला असे सांगितले. आसामच्या कामरुप जिल्ह्यातील हवामान हे फुलांच्या शेतीसाठी उपयुक्त आहे. यामुळे येथे वर्षभर झेंडु, गुलाब, जरबेरा, आर्किड, इत्यादी फुलांची शेती केली जाते. उत्पादित  फुलांची विक्री गुवाहाटी, आणि इतर ठिकाणी केली जाते. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे मंदिर, हॉटेल, लग्न समारंभ बंद आहेत, त्यामुळे फुलांची विक्री थांबली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होत असून

हे टाळण्यासाठी कामरुप कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना झेंडुची फुले उन्हात सुखवण्याचा सल्ला दिला. जर १०० किलो चाऱ्यात २ ते ३ किलो फुलांच्या पाकळ्या मिसळल्या तर कोंबड्यापासून अंड्याचे उत्पादन अधिक प्रमाणात केले जाऊ शकते. अंड्यांमध्ये केरोटीनचे प्रमाण वाढते असे  कृषी विज्ञान केंद्राने सांगितले आहे. कृषि विज्ञान केंद्राने या खाद्यनिर्मितीसाठी शेतकऱ्यांना झेंडुच्या पाकळ्या उन्हात वाळू घालण्यास सांगितले. वाळल्यानंतर  त्या कोंबड्यांना खाद्य म्हणून दिल्या. कोंबड्यांनी हे खाद्य खाऊन अंडे दिले तर त्या अंड्यांमध्ये केरोटीनचे प्रमाण चांगले असल्याचे निर्दशनास आले आहे.

केरोटीन हे रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. कॅरोटीनॉड्समध्ये बीटा कॅरोटीन खूप महत्त्वाचे आहे. बीटा कॅरोटीन हे गदड लाल, नारंगी आणि पिवळ्या रंगाच्या फळातून मिळत असते.  बीटा – कॅरोटीन कोणते पोषक तत्व नाही आहे. परंतु रेटिनॉलमध्ये त्याचे रुपांतर होत असते. जे आपल्या शरिरात विटामीन ए चे प्रमाण व्यवस्थित करते. ते डोळ्याचे आजार, कॅन्सर, हृदयासंबंधीच्या अनेक विकारांशी लढण्यास ताकद देत असते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments