Saturday, February 4, 2023
HomeGovt. schemePM किसान योजनेचा १० वा हप्ता 'या' तारखेपर्यंत जमा होणार; पैसे हवे...

PM किसान योजनेचा १० वा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत जमा होणार; पैसे हवे असतील तर ‘ही’ काळजी घेणं आवश्यक

किसानवाणी : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तयारी केंद्र सरकारने पूर्ण केली असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसानचे ९ हप्ते देण्यात आले आहेत. तर १० वा हप्ता १५ डिसेंबर २०२१ पर्यंत जमा होणार आहे. मागील वर्षी २५ डिसेंबर रोजी पीएम किसान योजनेचा ७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

पीएम किसान सन्मान निधी ही एक प्रमुख सरकारी योजना आहे, जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन स्वतंत्र हप्त्यांमध्ये ६००० रुपये वार्षिक मिळतात. हे तीन हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. २००० रुपयांचा आगामी हप्ता हा १० वा असेल आणि लवकरच तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

१० वा हप्ता हवा असेल तर ‘ही’ काळजी घेणे आवश्यक

पीएम किसान योजनेत जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्यात काही चुका असतील त्या वेळीच दुरुस्त करून घ्या. शेतकऱ्याचे नाव इंग्रजीमध्येच असणे आवश्यक आहे. अर्ज करताना अर्जदाराचे नाव मराठीत टाकू नका. अर्जामध्ये पात्र शेतकऱ्याचं नाव आणि बँक खात्याच्या तपशीलातील शेतकऱ्याचे नाव एकच ठेवा, नावाची स्पेलिंग वेगवेगळी ठेवू नका. आधार कार्डावर जे नाव आहे त्याप्रमाणेच अर्जावर नावं असणं आवश्यक आहे. बँकेचा आयएफएससी कोड चुकीचा असल्यास पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे बँकेचा तपशील नीट भरणे आवश्यक आहे. बँक खाते क्रमांक चुकल्यास पैसे मिळणार नाहीत. चुका दुरूस्त करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत १२.१४ कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेत सामील झाली आहेत. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या हप्त्याचा भाग म्हणून, देशभरातील १०.६९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा करण्यात आले आहेत. यावेळी, ११.३७ कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अपेक्षित आहे.

पीएम किसान योजनेचा निधी दुप्पट होणार?
गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान योजनेचा निधी दुप्पट होणार असल्याचे बातम्या येत आहेत. मिडीया रिपोर्टच्या अहवाल्याने ही माहिती दिली जात असून अद्याप पीएम ऑफिस कडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु मागील काही महिन्यांपूर्वी बिहारचे कृषि मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी दिल्ली मध्ये केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पीएम किसान योजनेची रक्कम दुप्पट करण्याची मागणी केली होती. तशी प्रतिक्रिया त्यांनी मिडियाला दिली होती. त्यावेळी त्यांनी येत्या काळात पीएम किसान योजनेची रक्कम दुप्पट होणार असल्याचे म्हणटले होते.

अशी करा नोंदणी
प्रथम PM किसान योजनेच्या या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाईट ला भेट द्या, याठिकाणी फार्मर्स कॉर्नरवर जा, या ठिकाणी नवीन नोंदणीच्या https://pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx या पर्यायावर क्लिक करा, आधार कार्ड नंबर आणि समोरील कॅप्चा कोड टाकून पुढे जा.
पूर्वी नोंदणी झाली असल्यास स्क्रीनवर तसा संदेश दाखवला जातो.

पूर्वी नोंदणी झाली नसल्यास नवीन नोंदणीसाठी विचारणा केली जाते. 

याठिकाणी Yes बटणावर क्लिक केल्यास अर्ज उघडला जातो.

येथे राज्य निवडून पुढील योग्य ती माहिती भरावी लागते. यामध्ये गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे आणि स्वतःचे नाव भरावे लागते. त्यानंतर कॅटेगिरी मधील पर्याय निवडावे लागतात. पुढे जमीन धारण केलेले क्षेत्र, बॅंक खात्याची माहिती, आयएफएससी कोड, खाते क्रमांक भरावा लागतो. अकाऊंट नंबर टाकल्यानंतर सब्मिट फॉर आधार ऑथेंटिकेशन असा पर्याय येतो. त्यावर क्लिक केल्यानंतप मोबाईल नंबर, जन्मतारिख, वडिलांचे नाव अशी माहिती भरावी लागते. ही माहिती भरल्यानंतर सातबारा वैयक्तिक आहे की सामायिक याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर जमीनीचे तपशील, सर्वे नंबर, (खासरा नंबर-उत्तर भारतातील जमीनधारकांसाठी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी ‘शून्य’ टाकावे) भरल्यानंतर अॅड या पर्यायावर क्लिक करावे. इथपर्यंत सर्व माहिती दिल्यानंतर पुढे येणारे घोषणा पत्र लिहून द्यावे लागते. यामध्ये ‘मी ही माहिती खरी असल्याचे घोषणा पत्र लिहून देत आहे, अशी माहिती येते. त्यानंतर पुढे क्लिक करून सेव्ह पर्याय दाबल्यास आपला अर्ज पोर्टवर नोंदणीसाठी पुढे जातो. 

यापुढे अर्जावरील प्रक्रियेची जबाबदारी तलाठी कार्यालयावर येते. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याने भरलेल्या अर्जाची पडताळणी करण्याची जबाबदारी तलाठ्यांवर येते. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला सातबारा, खाते पुस्तकाची प्रत, आणि आधार कार्डची झेरॉक्स तलाठी कार्यालयात जमा करावी. तसेच त्याची पोच घ्यावी. कालांतराने तलाठी कार्यालयाकडे पीएम किसान योजनेसाठी अर्ज केल्याचा पुरावा म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारे शेतकऱ्यांना स्वतः या योजनेत नोंदणी करून ६००० रूपयांचा लाभ घेता येतो.  

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments