PM किसान : दहाव्या हप्त्याची तारीख पुन्हा पुढे ढकलली; नवीन वर्षात खात्यात जमा होणार पैसे

किसानवाणी : गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता 25 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता किसान दिनादिवशी अर्थात 23 डिसेंबर ला देण्याचे नियोजन करण्यात आले होते. तशा सूचना ही बॅंकांना प्राप्त झाल्या होत्या. परंतु या तारखेत काही कारणास्तव बदल करून नवीन वर्षाच्या मुहुर्तावर म्हणजेच 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

23 डिसेंबर रोजी पैसे ट्रान्सफर करण्याची कार्यवाही रद्द करण्यात आली असल्याची सूचना बॅंकाना प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता 1 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पहावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता औपचारिक रित्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

यापूर्वी बॅंकाना आलेली सूचना

आतापर्यंत 11 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ गरजू शेतकऱ्यांना होत आहे. आतापर्यंत देशातील 11 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. गतवर्षी 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम अदा झाली होती. यंदाही नेमक्या कोणत्या दिवशी रक्कम जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. आता या संदर्भातले काम अंतिम टप्प्यात असून दहाव्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.

पीएम किसान योजनेचे नियम बदलले; ही गोष्ट तातडीने करा नाहीतर लाभापासून राहाल वंचित

  • पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
  • या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अशा प्रकारे ऑनलाइन करा ईकेवायसी –
– सर्वप्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
– त्यानंतर तुम्ही फार्मर कॉर्नरवर जा.
– येथे तुम्हाला ई-केवायसी (eKYC) च्या नवीन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– तुमच्या समोर एक नवीन पान उघडेल.
– त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि नंतर ओटोपी (OTP) टाका.
– जर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, तर ई-केवायसी (eKYC) पूर्ण होईल. प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर स्क्रीनवर इनव्हॅलिड (Invalid) लिहलेले दिसेल.

पीएम किसान योजनेचा हप्ता अडकू शकतो
ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया अवैध झाल्यास तुमचे पैसे अडकून पडू शकतात. जे तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन दुरुस्त करू शकता. केंद्र सरकार यावर्षीचा पीएम किसानचा शेवटचा हप्ता देणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये मदत दिली जाते.