९ ऑगस्ट अर्थात आज मिळणार ‘पीएम किसान’ चा हप्ता; ‘असे’ तपासा खाते

किसानवाणी :
पीएम किसान योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याची शेतकरी वर्गात उत्सुकता आहे. केंद्र सरकारने १ ऑगस्ट पासून ६ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले होते. सरकारच्यावतीने तशी प्रक्रिया सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र अद्याप पैसे आलेले नाहीत. याबाबत कृषि विभागातील सूत्रांकडून माहिती जाणून घेतली असता क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा लाभ देशभरातील तब्बल १० कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

पैसे हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडण्यापू्र्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आढावा बैठकही घेतली जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर पैसे हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. (पैसे जमा झालेले पाहण्यासाठी येथे क्लिक करा) पीएम किसान योजना ही देशभरातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळवून देणारी देशातील सर्वात मोठी आणि महत्वाची योजना असल्याचे सांगितले जात आहे. याचा आत्तापर्यंत देशातील ८ कोटी ५३ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांना १, २, ३ अशा स्वरूपात हप्ते मिळाले आहेत. तर उर्वरित हप्ते मिळणे बाकी आहे.

पीएम किसान योजनेचा लाभ प्रत्येक हप्त्याला किती शेतकऱ्यांना मिळाला, पहा आकडेवारी – 
आर्थिक वर्ष – २०१८ – १९
(डिसेंबर २०१८ – मार्च २०१९) –  ४ कोटी ५० लाख १९ हजार २२१ शेतकरी
आर्थिक वर्ष २०१९ – २०
(एप्रिल २०१९ – जुलै २०१९) – ७ कोटी ३५ लाख १ हजार २८९ शेतकरी
(ऑगस्ट २०१९ – नोव्हेंबर २०१९) – ८ कोटी २४ लाख ७६ हजार ५८२ शेतकरी
(डिसेंबर २०१९ – मार्च २०२०) – ८ कोटी ५१ लाख ९२ हजार ९६७ शेतकरी
आर्थिक वर्ष – २०२० – २१
(एप्रिल २०२० – जुलै २०२०) – ८ कोटी ५२ लाख ९८ हजार ४०९ शेतकरी

देशातील साडे चौदा कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे अद्यापही अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारही जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विशेष मोहिम राबवत असून ज्या शेतकऱ्यांना अद्याप या योजनेपासून वंचित रहावे लागले आहे, त्यांनी त्वरित सेवा केंद्र अथवा सरकारी यंत्रणेशी संपर्क साधून या योजनेसाठी नोंदणी करावी. 

महत्वाच्या लिंक –
लाभार्थ्यांच्या खात्याचा तपशील
लाभार्थी यादी
नवीन नाव नोंदणी
आधार अपडेट