Homeयोजनाशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : 'या' दिवशी १२:३० वाजता मिळणार पीएम किसान याजनेचा...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : ‘या’ दिवशी १२:३० वाजता मिळणार पीएम किसान याजनेचा ९ वा हप्ता

किसानवाणी : पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून शेतकऱ्यांच्या खात्यात ९ वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. ९ ऑगस्ट रोजी देशभरातील ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रूपये जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रांती दिनाच्या दिवशी व्हीडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून दुपारी १२ः३० वाजता आयोजिक कार्यक्रमात याबाबतची औपचारिकता पूर्ण करतील. त्यानंतर देशभरातील बॅंकामधून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जातील.

गेल्या दोन वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी १६ हजार रूपये पाठवले असून ही रक्कम ८ हप्त्यात वितरित करण्यात आली आहे. आता या योजनेचा नववा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. येत्या ९ ऑगस्टला क्रांती दिनाच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वितरित होण्याची शक्यता आहे. मागील आठव्या हप्त्याचा लाभ देशातील १० कोटी ७१ लाख ९३ हजार ३९९ शेतकऱ्यांनी घेतल्याची नोंद पीएम किसान वेबसाईटवर करण्यात आली आहे. तर नववा हप्ता जवळपास ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या खात्यात पैसे आल्याची माहिती तपासण्यासाठी नोंदणी साठी बेनिफिशअरी स्टेटस (https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx) तपासणे गरजेचे आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अजून नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी स्वतःच आपल्या मोबाईल वरून पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्याची संपूर्ण माहिती देखील या वेबसाईटवर (www.pmkisan.gov.in) पहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments