HomeयोजनाPM Kisan : E KYC करताना OTP Invalid, OTP न मिळणे, किंवा...

PM Kisan : E KYC करताना OTP Invalid, OTP न मिळणे, किंवा Record Not Found या समस्या उद्भवल्यास हे काम करा…

किसानवाणी | पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी इ-केवायसी (E Kyc) पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शक्य तितक्या लवकर इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन घेण्याचं आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आलं आहे. इ केवायसी कशी पूर्ण करायची, हे आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊयात. तसेच इ केवायसी करताना OTP Invalid, मोबाईल वर ओटीपी न येणे, किंवा Record Not Found या समस्या उद्भवल्यास काय करायचे हे ही जाणून घेऊया.

E Kyc करण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटवर लॉगीन करा. वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरच्या बाजूला लाल अक्षरात मोठं वाक्य दिसेल. इंग्रजीत हे वाक्य असेल. या मेसेजद्वारे लाभधारकांना इ-केवायसी करणं बंधनरकारक असल्याचं म्हंटलं आहे.  तसेच इ-केवायसी करण्याचे 2 मार्गही सांगण्यात आले आहेत. 

मोबाईल-आधार लिंक आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अशा दोन पद्धतीने तुम्ही इ-केवायसी पूर्ण करु शकता. तुमचा मोबाईल नंबर आधारसह लिंक असेल, तर तुमचं काम सोपं होईल. मोबाईल नंबरसह आधार लिंक असल्यास, Aadhaar Based Otp Authentication च्या माध्यमातून लाभदराकांना इ-केवायसी पूर्ण करता येईल. यासाठी वेबसाईटवर फॉर्मर कॉर्नमध्ये E-kyc या मेन्यूवर क्लिक कराव लागेल आणि आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाव्दारे ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. ही झाली E Kyc पूर्ण करण्याची एक पद्धत. 

दुसरी पद्धत अशी की, बायमेट्रिक प्रामाणिकरण (Biomatric Authentication) या पद्धतीनेही इ-केवायसी अपडेट करता येईल. मात्र यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन हे काम करुन घ्याव लागेल.   

इ केवायसी मोबाईल आणि आधार क्रमांकाव्दारे पूर्ण करताना  OTP Invalid, मोबाईल वर ओटीपी न येणे, किंवा Record Not Found या समस्या उद्भवल्यास काय कराल?

केंद्र सरकारने E Kyc सेवेला आत्ताच सुरुवात केली आहे. केवायसी बंधनकारक असल्याने अनेक जण एकाचवेळी ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे सर्व्हरवर ताण येत असल्याने अनेकदा तुम्ही टाकलेल्या ओटीपीवर Invalid Otp, Record not Found किंवा OTP न येणे अशा समस्या उद्धभवत आहेत. असं झाल्यास काही वेळानी किंवा काही दिवसांनी पुन्हा प्रयत्न करून पाहणे गरजेचे आहे. वारंवार प्रयत्न करून देखील E KYC पूर्ण होत नसल्यास तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला बायोमेट्रिक पध्दतीने E KYC पूर्ण करुन घ्यावी लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments