HomeयोजनाPM Kisan : घरबसल्या eKYC बंद, 'असा' आहे नवा नियम; 11 वा...

PM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा

नवी दिल्ली | पंतपधान किसान सन्मान निधी योजनेच्या (Prime Minister Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र आता ते घरबसल्या आपल्या मोबाइलवरून ई-केवायसी (Pm kisan eKYC) प्रक्रिया करू शकणार नाहीत. ओटीपी ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून आधार क्रमांक आधारित eKYC प्रक्रिया आता होऊ शकणार नाही. ही प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊनच केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवरच्या एका संदेशानुसार ओटीपी बेस्ड ईकेवायसी (ekyc) सुविधा तात्पुरत्या स्वरूपात काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ही सेवा आता पुन्हा कधी सुरू करण्यात येईल, याविषयी वेबसाइटवर काहीही माहिती दिलेली नाही. आधी शेतकऱ्यांना आपल्या घरातूनच मोबाइलवरून किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा पर्याय होता; पण आता घरबसल्या करण्याचा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे CSC ला जाण्यावाचून पर्याय नाही.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अनिवार्य eKYC पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत सरकारने वाढवून दिली आहे. आता लाभार्थी शेतकरी 31 मे 2022 पर्यंत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. PM Kisan पोर्टलवरच्या माहितीत म्हटलं आहे, की ‘पीएम किसान योजनेत नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी कृपया जवळच्याच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) संपर्क साधावा. ओटीपी ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून आधारवर आधारित eKYC प्रक्रिया अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे नक्की आहे की, eKYC करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये म्हणजेच CSC मध्ये जावं लागेल. तिथे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनच्या साह्याने शेतकऱ्यांना eKYC प्रक्रिया करावी लागेल.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एका वर्षात लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये मिळतात. ही रक्कम वर्षात तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. पुढच्या आठवड्यात 11 वा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments