HomeयोजनाPM किसान : पैसे मिळत नसल्यास 'या' पर्यायाचा करा वापर, खात्यात जमा...

PM किसान : पैसे मिळत नसल्यास ‘या’ पर्यायाचा करा वापर, खात्यात जमा होतील वर्षाला ६००० रूपये..!

किसानवाणी :
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना असून आत्तापर्यंत ११.३३ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यंदाच्या चालू वर्षातील हप्त्यापोटी सरकारने एप्रिल आणि ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २०००-२००० रूपये जमा केले आहेत. तर आता तिसरा म्हणजेच यंदाच्या आर्थिक वर्षातील शेवटचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या १ तारखेपासून ३१ मार्च २०२१ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

असे असले तरी, या योजनेचा लाभ एक दोन हप्ते मिळाल्यानंतर बंद झालेल्या शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अशा अचानक लाभ मिळणे बंद झालेल्या शेतकऱ्यांनी Help Desk या पर्यायाचा वापर करावा. जेणेकरून त्यांचे पैसे मिळण्यास मदत होईल.

काय आहे Help Desk?
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या हेल्प डेस्कला विजीट करून तुम्ही तुमची समस्या मांडू शकता. यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन फार्मर्स कॉर्नरवरील (Farmers corner) शेवटच्या हेल्प डेस्क (Help Desk) या पर्यायाचा वापर करून आपली तक्रार मांडता येते. Help Desk या पर्यायावर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल. जर आपण पहिल्यांदाच समस्या मांडत असाल तर Register Query या पर्यायावर क्लिक करा. याठिकाणी आपला आधार नंबर, मोबाईल नंबर अथवा बॅंक खाते नंबर यापैकी एक पर्याय निवडून त्याची माहिती भरावी. त्यांनतर तुम्ही तुमची समस्या लिहून ती सबमीट करा. तुमची तक्रार सबमीट झाल्यानंतर मिळालेला Query ID जपून ठेवा.

Help Desk ऑप्शन वर तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करण्याचा ऑप्शन देखील अपलब्ध आहे. Help Desk वर क्लिक केल्यानंतर Know the Query Status हा पर्याय निवडून माहिती घेता येते. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळालेला Query ID, आधार नंबर, अकाऊंट नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून आपल्या तक्रारीची सद्यस्थिती पडताळून पाहता येते. त्यावर मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही तुमच्या खात्यासंबंधीत आवश्यक त्या दुरूस्त्या करून घेऊ शकता. त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे येणे सुरू होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments