Homeबातमी शेतीचीPM किसान योजनेला महाराष्ट्रातही गालबोट; अपात्र व्यक्तींनी घेतला लाभ

PM किसान योजनेला महाराष्ट्रातही गालबोट; अपात्र व्यक्तींनी घेतला लाभ

किसानवाणी :
देशातील शेतकरी वर्गात प्रसिध्द असणाऱ्या पीएम किसान योजनेत महाराष्ट्रातही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. उत्तरप्रदेश, तामिळनाडू, ओडिसा या राज्यात यापूर्वी घोटाळ्याचे प्रकरणे उघडकीस आली होती. सर्वात आधी तामिळनाडू राज्यात अपात्र व्यक्तीनी या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली होती. महाराष्ट्रातही अशाच प्रकारे फसवणूक झाली असून अपात्र व्यक्तींनी लाभ घेतल्याचे दिसत आहे.

एकाच कुटूंबातील एकापेक्षा अधिक व्यक्ती, आयकर भरणाऱ्या व्यक्ती, नावावर जमीन नसणाऱ्या व्यक्ती, सरकारी नोकरदार व्यक्ती, वकील, डॉक्टर असा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा या अपात्र यादीत समावेश आहे. ज्या व्यक्तीनी अपात्र असतानाही लाभ घेतला आहे. अशा व्यक्तींकडून पैसे परत घेण्याची कारवाई सूरू झाली आहे. याबाबत ११ सप्टेंबर रोजीच कृषी आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तसेच नोडल ऑफिसरना याबाबत पत्राव्दारे कळवले आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात राज्यातील ८.७८ लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. १ जून २०२० मध्ये राज्यात १०१.१५ लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली होती. तर १० सप्टेंबर २०२० पर्यंत १०९.९३ लाख लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. 

घोटाळ्यानंतर केंद्र सरकारने सगळ्याच राज्यांना पीएम किसान योजनेच्या खातेदारांची चौकशी करण्यास सांगितले आहे. यासाठी राज्यातल्या सगळ्या लाभार्थ्यांपैकी कोणत्याही (रँडम पध्दत) ५ टक्के गावांची तसेच लाभार्थ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही गावे आणि लाभार्थी कोण असतील याची यादीही केंद्र सरकारने प्रशासनाला दिली आहे. ही पडताळणी पुढील ६० दिवसात करून अपात्र व्यक्तींची खाती रद्द करण्यास सांगितले आहे.

  • पीएम किसान योजनेत तामिळनाडू राज्यात ऑगस्ट २०२० मध्ये जवळपास १०० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले. तामिळनाडूतल्या कडलोर, कल्लाकुरूची, वेल्लोर, सालेम, त्रिची तसेच थिरूवरून जिल्ह्यात हजारो अपात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ देत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसै जमा केल्याचे उघडकीस आले होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments