पीएम किसान योजनेत श्रेयवादावरून सावळागोंधळ; योजनेपासून असंख्य शेतकरी वंचित

किसानवाणी : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची रक्कम अद्याप असंख्य शेतकऱ्यांना मिळालेली नाही. याबाबत तहसिल कार्यालयात विचारणा करावयास गेलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे जा, या योजनेवर बहिष्कार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सन्मान समजल्या जाणाऱ्या योजनेपासून शेतकरीच वंचीत राहील्याचे चित्र आहे. बुलडाणा जिल्ह्यातील या घटनेमुळे पीएम किसान योजना कृषि आणि महसूल विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

नमस्कार शेतकरी बंधूनो, आपलं आवडतं भारत अ‍ॅग्री अ‍ॅप देतयं सर्व पिकांविषय़ी शास्त्रीय माहिती. यामध्ये आपल्याला मिळेल प्रत्येक पिकाची संपूर्ण माहिती, तीही एका क्षणात. चला तर लगेचच डाऊनलोड करा भारत अ‍ॅग्री अ‍ॅप आणि करा आपल्या पीकांचे उत्तम व्यवस्थापन.
#BharatAgriApp

दोन हजार रुपयांच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांची फरपट होत आहे. त्यामुळे शासन आदेशास न जुमानणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी दि. १७ ऑगस्ट रोजी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी कृषी आयुक्त तथा पि एम किसान योजना अंमलबजावणी प्रमुख धिरज कुमार यांच्याकडे केलीय.

शासनाकडून शेतकरी हितासाठी पि एम किसान सन्मान योजना सुरु केली आहे. यासाठी ग्राम,तालुका, जिल्हानिहाय समित्या स्थापन करुन जिल्हाधिकारी अध्यक्ष तर उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणुन नियुक्त करण्यात आले होते. या योजनेसाठी लाभार्थी निवड व माहिती संकलन व फिडींग करणे हि जबाबदारी तहसिल विभागाची होती. असे असतानाही काहिना योजनेचा लाभ मिळाला तर असंख्य शेतकरी आज ही या योजनेपासुन वंचित आहेत. सदर योजनेसाठी माहिती संकलीत करणे हि जबाबदारी संबंधीत तलाठी यांची होती. तर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यासाठी सहकार्य करतील असे शासन आदेशात नमुद करण्यात आले आहे.

या योजनेपासुन असंख्य शेतकरी वंचीत असताना काही महिन्यापूर्वी कृषी विभागास या योजनेतील उत्कृष्ट कामकाजाबद्दल पुरस्कार देण्यात आलाय. तेव्हा पासुन कृषी विभाग व महसुल विभाग यांच्यात श्रेयवाद पेटलाय. यामुळेच या योजनेत व कार्य पध्दतीत कसलेही बदल करु नये, असे आदेश देखील १/०४/२०२१ रोजी कृषी आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते. परंतु तरीसुद्धा तहसिल विभागाकडुन शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे. तर कृषी विभाग मात्र आमचा आणि योजनेचा संबंध नसल्याचे सांगत असल्याने शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हा श्रेयवाद थांबवुन शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी अशी मागणी करण्यात आलीय.

शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजने पासून वंचित ठेवणाऱ्या माहिती संकलन व फिडींग करणाऱ्यांची चौकशी करावी, दोषींवर निलंबनाची कारवाई करावी, पीएम किसान योजनेपासुन वंचीत असलेल्यांचा समावेश योजनेत करण्यात यावा, योजनेचे हप्ते प्राप्त न झालेल्यांच्या खात्यावर थकीत रक्कम जमा करावी, यासह आदि मागण्या लेखी निवेदनाव्दारे करण्यात आल्या असुन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी माजी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, विदर्भध्यक्ष दामुअन्ना इंगोले, विकास देशमुख, यांच्यासह प्रमुख शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.