HomeयोजनाPM किसान : सातवा हप्ता मिळण्यास सुरवात; 'हे' स्टेटस दिसत असेल तर...

PM किसान : सातवा हप्ता मिळण्यास सुरवात; ‘हे’ स्टेटस दिसत असेल तर करून घ्या खात्री

किसानवाणी :
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना केंद्र सरकारकडून राबवली जात आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना विविध टप्प्यांमध्ये तीन हप्त्यात प्रत्येकी 2 हजार असे 6 हजार रुपये पाठवले जातात. आतापर्यंत 6 टप्प्यात शेतकऱ्यांना हप्ते पाठवण्यात आले आहेत. दरम्यान काही राज्यात या योजनेचा सातवा हप्ता पाठवण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना खत, बी-बियाणं आणि शेतीसंबंधित इतर गोष्टी खरेदी करता याव्या यासाठी सरकारकडून ही आर्थिक मदत केली जात आहे.

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले स्टेटस तपासणे आवश्यक आहे. स्टेटस तपासत असताना त्या स्टेटसचा अर्थ काय आहे हे देखील शेतकऱ्यांना माहित असणं गरजेचं आहे. उदा. जर  तुमच्या स्टेटसमध्ये  FTO is Generated and Payment confirmation is pending असं लिहलेलं असेल तर याचा अर्थ असा होतो की, सरकारने तुम्ही दिलेली माहिती कन्फर्म केली आहे. लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. याचप्रमाणे तुम्हाला Rft Signed by State Government असं स्टेटस दिसत असल्यास यातील RFT चा अर्थ Request For Transfer असा आहे. अर्थात तुम्ही दिलेली माहिती तपासण्यात आली आहे आणि ती पुढे ट्रान्सफर करण्यात आली आहे. आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील.

या योजनेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अप्लाय केल्यानंतर राज्य सरकारकडून तो  अर्ज तुमचा रेव्हेन्यू रेकॉर्ड, आधार क्रमांक आणि बँक खाते  तपासून व्हेरिफाय केला जातो. जोपर्यंत हे व्हेरिफिकेशन पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत. राज्य सरकारकडून तुमचा अर्ज व्हेरिफाय करून झाल्यानंतर FTO जेनरेट केला जातो. त्यानंतर केंद्र सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करते.

पीएम किसान योजनेसंदर्भात तक्रार असल्यास थेट करा कृषी मंत्रालयाशी संपर्क :
पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर: 18001155266
पीएम शेतकरी सन्मान हेल्पलाइन नंबर: 155261

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments