Saturday, February 4, 2023
HomeGovt. schemePM Kisan | आता शेतकर्‍यांना 2000 रु. च्या हप्त्यासोबत मिळेल 3000 रुपयांचे...

PM Kisan | आता शेतकर्‍यांना 2000 रु. च्या हप्त्यासोबत मिळेल 3000 रुपयांचे गॅरेंटेड मासिक उत्पन्न, ‘ही’ आहे प्रोसेस

किसानवाणी : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan) अंतर्गत सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपयांचे 3 हप्ते म्हणजे वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. आतापर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात या योजनेचे 9 हप्ते म्हणजे 18,000 रुपये आले आहेत. आता शेतकर्‍यांना पुढील 10 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. हा हप्ता 15 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबरोबरच केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीसाठी आणि वृद्धत्व सुरक्षित करण्यासाठी पेन्शनची सुविधा ’पीएम किसान मानधन योजना’ या नावाने उपलब्ध करून दिली आहे. पीएम किसान मानधन योजना अंतर्गत 60 वर्षाच्या वयानंतर पेन्शनची तरतूद आहे.

पीएम किसान मानधन मध्ये थेट रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी कोणत्याही कागदपत्रांच्या कारवाईची आवश्यकता लागत नाही. पीएम किसान योजनेसाठी देण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारेच या योजनेत नोंदणी केली जाते. त्याचबरोबर पेन्शन योजनेसाठी आवश्यक अंशदान सुद्धा पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत येणार्‍या सरकारी मदतीतून कापून घेतलेे जाते.

यात वयाच्या हिेशेबाने मासिक अंशदान केल्यास 60 च्या वयानंतर 3000 रुपये मासिक किंवा 36000 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल. यासाठी अंशदान 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत मासिक आहे. अंशदान शेतकऱ्याच्या वयावर अवलंबून आहे.

अधिक माहितीसाठी पीएम किसान पेन्शन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.. https://pmkmy.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments