‘या’ दिवशी जमा होणार PM किसानचे पैसे; पंतप्रधानांनी जाहीर केली तारीख

किसानवाणी :
केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या पीएम किसान योजनेचा यंदाच्या आर्थिक वर्षातील तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तारीख स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. ते मध्यप्रदेश येथील किसान महासंमेलनात बोलत होते. पीएम ऑफिसकडून देखील याबाबत अधिकृत ट्विट करण्यात आले आहे. पीएम ऑफिसने केलेल्या ट्विटनुसार पीएम किसान योजनेचा हप्ता अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी अर्थात २५ डिसेंबर रोजी ट्रान्सफर केला जाणार आहे. 

PMO India Tweet (या शब्दांवर क्लिक करून पहा ट्विट)

केंद्र सरकारने यंदाचे पहिले दोन हप्ते १५ दिवसांच्या आत शेतक-यांच्या खात्यात जमा केले होते. यामुळे शेतकऱ्यांना कोरोना संकटात शेतीसाठीचे साहित्य, बियाणे आदी खरेदी करण्यास मदत मिळाली होती. मात्र यावेळेचा तिसरा हप्ता मिळण्यास काही कारणांमुळे उशीर झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी एखादा महत्वाचा दिवस बघूनच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाचा मुहुर्त साधला आहे. 

हप्ता मिळण्यापूर्वी तपासा रेकॉर्ड –
1. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइटला ‘शेतकरी कॉर्नर’ टॅब क्लिक करावे लागेल.
2. आपण यापूर्वी अर्ज केला असेल आणि तुमचा आधार योग्य प्रकारे अपलोड झाला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केला गेला असेल तर त्याची माहिती त्यात सापडेल.
3. शेतकरी कॉर्नरमध्ये पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नावनोंदणी करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.
4. यात शासनाने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी अपलोड केली आहे. आपल्या अर्जाची स्थिती काय आहे. याबाबत आधार क्रमांक / बँक खाते / मोबाइल नंबरद्वारे शेतक-यांना माहिती मिळू शकते.
5. या योजनेचा लाभ देण्यात आलेल्या शेतक-यांची नावे राज्य / जिल्हानिहाय / तहसील / गावानुसार पाहिली जाऊ शकतात.