Homeबातमी शेतीचीशेतकऱ्यांना दिलासा; सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली

शेतकऱ्यांना दिलासा; सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली

किसानवाणी :
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी 1 जानेवारी 2021 रोजी पासून उठवली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीचा निर्णयावर चौफेर टीका झाली होती. अखेर केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला असून यामुळे कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारने कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातली होती. किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांवर कांदा साठवणूकीसाठी मर्यादा घातली होती. किरकोळ व्यापारी दोन टन कांदा साठवू शकत होते तर घाऊक व्यापारी 25 टन कांदा साठवून ठेवू शकत होते.

निर्यात बंदीचा हा निर्णय सप्टेंबर महिन्यात 14 तारखेला घेण्यात आला होता. त्यानंतर कांद्याची परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आली होती. परदेशातून कांदा आयात करून व्यापाऱ्यांना साठवणुकीचे बंधन घालून दिल्याने राज्यात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पहायला मिळाले. कांदा निर्यात बंदी त्वरित हटवावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्राचा विचार केला तर देशाच्या एकूण कांदा उत्पादनापैकी सर्वाधिक हिस्सा हा महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे सरकारच्या निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे नेहमीच नुकसान होते. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. कांद्यासाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा जास्तीचे कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments