एका क्लिकवर पहा ‘पोकरा’ योजनेची लाभार्थी यादी; 5 हजार 142 गावातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

किसानवाणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थात पोकरा योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी या योजनेसंदर्भात विभागाने एक अपडेट दिले आहे. त्यामध्ये पात्र लाभार्थी यादी ही देण्यात आली आहे.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी www.mahapocra.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर  latest update मध्ये ना.दे.कृ.सं. प्रकल्पांतर्गतगावनिहाय – गाव माहिती पत्रक, नकाशे, लाभार्थ्यांची यादी मिळवण्याकरिता येथे क्लिक करा.

यानंतर आपल्यासमोर जे नवीन पेज उघडेल त्यामध्ये आपल्याला आपला जिल्हा, तालुका, गाव निवडायचे आहे, त्यानंतर खाली निळ्या पट्टीमध्ये डाऊनलोड village profile असे दिसेल त्यावर क्लिक करून आपण आपल्या गावाची संपूर्ण माहिती याठिकाणी बघू शकता. तसेच खाली  डाऊनलोड Benificiery List जी पिवळ्या कलर मध्ये आहे त्यावर क्लिक करून आपण लाभार्थी यादी डाऊनलोड करून पाहू शकता.