किसानवाणी :
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आर्थिक संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे. तीन समान हप्त्यांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रूपये जमा होत आहेत. आत्तापर्यंत केंद्र सरकारने या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६ हप्त्यांचे पैसे वाटप केले असून देशातील जवळपास साडेदहा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.
आत्ता शेतकरी वर्गात पुढील हप्त्याची उत्सुकता असून PM किसान योजनेचा सातवा हप्ता कधी येणार याकडे देशातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाचवा आणि सहावा हप्ता लवकर दिल्याने आता सातवा हप्ताही लवकर मिळेल अशी शेतकरी वर्गाला आशा आहे. वर्षभरातील हप्त्यांचे नियोजन पाहता सातवा हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्चच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जाण्याची शक्यता आहे. शक्यतो डिसेंबर महिन्याच्या कालावधीत सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात मिळेल असेही सांगितले जात असले तरी कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता डिसेंबर ते मार्चपर्यंत केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पाठवले जातील.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने खूप चांगली सुविधा उपलब्ध करून दिली असून शेतकरी स्वतःची नोंदणी स्वतः करू शकणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून पीएम किसान योजनेच्या
– https://pmkisan.gov.in/ वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर ‘फार्मर्स कॉर्नर’ वर नोंदणी करता येणार आहे. येथे
– https://pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx ‘नवीन शेतकरी नोंदणी’वर क्लिक करा
– एक नवीन टॅब उघडली जाईल
– येथे आपला आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका, ‘Click here to continue’वर क्लिक करा’
– त्यानंतर आपल्या नोंदणीसाठी फॉर्म उघडेल
– याठिकाणी जमिनीची माहिती देण्यासाठी सर्वे नंबर, खाते नंबर, खसरा क्रमांक आणि जमिनीचे क्षेत्र याची माहिती भरा
– यानंतर ‘Save’ वर क्लिक करा, अशा प्रकारे घरबसल्या तुमची तुमची नोंदणी पूर्ण करा.
फार्मर्स कॉर्नरवर शेतकऱ्यांना उपलब्ध असणाऱ्या सुविधा –
नवीन नोंदणी – https://pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx
आधार अपडेट – https://pmkisan.gov.in/UpdateAadharNoByFarmer.aspx
लाभार्थी स्थिती – https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx
लाभार्थी यादी – https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx
स्वत: नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची माहिती – https://pmkisan.gov.in/FarmerStatus.aspx
स्वतः नोंदणी केलेल्यांसाठी चुकांची दुरूस्ती – https://pmkisan.gov.in/SearchSelfRegisterfarmerDetails.aspx
किसान क्रेडीट कार्ड साठी नोंदणी फॉर्म – https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf