Saturday, January 28, 2023
HomeAgriculture Newsशेतकर्‍यांना 'या' योजनेअंतर्गत मिळणार 'विनामूल्य' बियाणे

शेतकर्‍यांना ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार ‘विनामूल्य’ बियाणे

किसानवाणी : केंद्रीय कृषीमंत्रालयाने शेतकऱ्यांना डाळी (seeds) व तेलबिया यांचे उच्च उत्पादन देणारे बियाणे वाटप करण्यासाठी ‘मिनीकीट’ कार्यक्रम सुरू केला आहे. ही मिनी किट राष्ट्रीय बियाणे महामंडळ (एनसीएस), नाफेड आणि गुजरात राज्य बियाणे कॉर्पोरेशन यासारख्या राष्ट्रीय संस्थांकडून पुरविली जात आहेत. यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशनच्या माध्यमातून वित्तपुरवठा करीत आहे.

बियाणे ‘मिनी किट’ कार्यक्रमाची सुरुवात कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना डाळी व तेलबिया यांचे उच्च उत्पादन देणारे बियाणे वाटप करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी तोमर म्हणाले की, केंद्र सरकार राज्यांच्या सहकार्याने डाळ व तेलबियांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवित आहे. याचा हेतू शेतकऱ्यांना चांगले बियाणे मिळावे, जेणेकरून उत्पादन वाढविण्यास मदत मिळेल.

15 जून 2021 पर्यंत विनाशुल्क वितरण :
मिनी किट कार्यक्रमांतर्गत बियाणे वाटप 15 जून 2021 पर्यंत सुरू राहील, जेणेकरून खरीप पिकांच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना बियाणे मिळतील. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत डाळींचे एकूण 20,27,318 मिनी किट, सोयाबीनचे आठ लाखाहून अधिक मिनी किट आणि शेंगदाण्याचे 74,000 मिनी किट्स शेतकऱ्यांना विनाशुल्क देण्यात येतील. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2014-15 पासून डाळी व तेलबियांचे उत्पादन वाढविण्यावर नव्याने लक्ष दिले जात आहे. याच काळात डाळींचे उत्पादन 17.15 दशलक्ष टनांवरून 25.56 दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे. तर आता यात मोठी वाढ होत आहे . तेलबियाचे उत्पादन 27.51 वरून 36.57 दशलक्ष टन इतके वाढले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments