यशोगाथा

शेतीमध्ये पिकवण्यापासून विकण्यापर्यंतचे कौशल्य.. मग ते धान्य असो वा मशीन.. सर्वच बाबतीत ‘ही’ महिला आहे अग्रेसर

किसानवाणी : शेतीतील पेरणीपासून कापणीपर्यंत आणि त्यापलीकडे कृषी क्षेत्रातील सर्व कामांमध्ये महिला शेतकरी वर्गाचे योगदान पावलो पावली पाहायला मिळते. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) मते, भारतीय शेतीमध्ये महिलांचा वाटा सुमारे 32 टक्के आहे. असे असूनही ‘ती’ या क्षेत्रात आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. शेतीमधील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांना वापरता येतील अशा मशिन बनवल्या जात नाहीत, तर दुसरीकडे मंडईत त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे शेती व्यवसायाच्या क्षेत्रातील यशोगाथांमध्ये ‘ती’ आजही संदर्भाबाहेर राहिलेली दिसत आहे.

परंतु जिद्द आणि कतृत्वाच्या जोरावर अशा काही महिला आपल्या पहायला मिळतात, ज्या पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतात, आणि आपल्या कतृत्वाचा ठसा सगळीकडे उमटवतात. आज आम्ही आपल्याला पुरूषांची मक्तेदाऱी असणाऱ्या शेती क्षेत्रातील अशाच एका व्यवसायात आपला ठसा उमटवलेल्या महिलेची यशोगाथा सांगणार आहोत. विशेष म्हणजे ही महिला फक्त शेती व्यवसायाशी संबंधित व्यवसायातच काम करत नाही तर नामांकित महाविद्यालयात प्राध्यपक म्हणून देखील कार्यरत आहेत. त्याचबरोबर दूरदर्शन सारख्या माहिती प्रसारण सेवेच्या क्षेत्रात देखील या महिलेने काम केले आहे.

ही महिला मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ शहरात राहणारी असून, तिचे नाव रचना बेदी आहे. या महिलेने पुरूषांची मक्तेदारी असणाऱ्या कृषि क्षेत्रासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीच्या खरेदी विक्री व्यवसायात आपला ठसा उमटवला आहे. हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी रचना बेदी भोपाळ येथील नामांकित कृषि साप्ताहिकात संवाददाता पदावर काम करत होत्या. याच दरम्यान त्यांची भेट कृषी अभियांत्रिकीचे,संचालक श्री. राजीव चौधरी यांच्याशी झाली. यावेळी चौधरी यांची मुलाखत घेत असताना, रचना बेदी यांना कळले की शेतकऱ्यांना अनुदानातून कृषी यंत्रे आणि औजारे घेता येतात. उत्सुकतेपोटी रचना यांनी सहाय्यक कृषी अभियंता अहिरवार यांच्याकडून अधिक माहिती मिळवली. यावेळी त्यांना कळले की, पुरुषांच्या तुलनेत तब्बल ५० टक्के महिलांना अनुदान दिले जाते.

“कृषी संशोधनाच्या वार्षिक मेळाव्यात मी प्रथमच सर्व यंत्रसामुग्री एकत्र पाहिली. यावेळी मी APL लेझर लँड लेव्हलर मशीनकडे अधिक आकर्षिले गेले. एपीएल मशीन पाहून मशीनची माहिती घेण्यासाठी आणि फर्मची नोंदणी करण्यासाठी मनिंदर सिवालचे प्रादेशिक विक्री व्यवस्थापक यांची भेट घेतली, आणि अवघ्या काही दिवसातच आकाश अॅग्रो सेल्स अँड सर्व्हिसेस या फर्मची सुरवात केली.”
– रचना बेदी, भोपाळ (प्रोफेसर पीपल्स ग्रुप, ग्राफिक्स डिझायनर, पटकथा लेखक आणि जनसंपर्क)

रचना बेदी यांचे आकाश अॅग्रो हे अत्याधुनिक कृषि यंत्रसामुग्रीचे स्टोअर, बेडखेडी स्क्वेअर, विदिशा, भोपाळ हायवे, जि. रायसेन याठिकाणी आहे. व्यवसायाची सुरवात केल्यानंतर मिळत असलेल्या अनुभवातून त्यांनी शेती क्षेत्रासाठी लागणाऱ्या सर्व मशीनरी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस नव्याने येणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत विशेषत: महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

आपल्याप्रमाणेच इतर महिलांनी देखील या व्यवसायात येण्याचे आावहन रचना बेदी करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार “कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजनेंतर्गत घेतलेल्या बँक कर्जावरील सबसिडी पुरुषांसाठी 36 टक्के तर महिलांसाठी तब्बल 44 टक्के आहे. कृषी विपणनाच्या एकात्मिक योजनेंतर्गत, पुरूष शेतकर्‍यांसाठी 25 टक्क्यांच्या तुलनेत महिलांना साठवण पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये 33.33 टक्के अर्थ सहाय्य प्रदान केले जाते. तर कृषी यांत्रिकीकरणामध्ये महिलांना मशीन खरेदीवर 10 टक्के अधिक आर्थिक सहाय्य दिले जाते. त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत वनस्पती संरक्षण आणि आधुनिक उपकरणांसाठी पुरुषांपेक्षा 10 टक्के अधिक आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे शासनाच्या वतीने महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचाही चांगला वापर करून आपल्या व्यवयाची चांगली ओळख निर्माण करता येते.

रचना बेदी सांगतात की, गेल्या काही वर्षांत, कृषी तंत्रज्ञानाच्या बदलत्या लँडस्केपमध्ये आणि महिला कृषी कामगारांच्या उच्च सहभागामध्ये महिलांना वापरता येतील अशी यांत्रिक साधने, उपकरणे तसेच कार्यस्थळांच्या विकासावर अधिक लक्ष दिले जात आहे. महिलांनाही आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावा यासाठी अशी उपकरणे तयार करण्यात येत आहेत. त्याचबरोबर ही अवजारे योग्य आणि सुरक्षितपणे चालवण्यासाठी महिला कामगारांना जागरूक आणि प्रशिक्षित करणे, उत्पादक आणि उद्योजकांना अशी कृषी अवजारे तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि वापरकर्त्यांद्वारे खरेदीसाठी ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच अशी उपकरणे खरेदी करण्यासाठी बँका आणि इतर संस्थांकडून कर्ज मिळवण्यासाठी महिलांना मदत करणे गरजेचे आहे, आणि हे काम आकाश अॅग्रो सेल्स अँड सर्व्हिसेसच्या माध्यमातून केले जाते.

एकूणच रचना बेदी यांनी महिलांच्या दृष्टीने आव्हानात्मक वाटणाऱ्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. त्यामुळे त्यांच्या स्टोअर मधून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती करणाऱ्या महिलांची खरेदीसाठी संख्या वाढताना दिसतेय, आणि या महिला देखील शेती क्षेत्रात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Kisanwani

Share
Published by
Kisanwani

Recent Posts

किड नियंत्रणामध्ये कामगंध सापळ्यांचे महत्व; कामगंध सापळ्यांचे प्रकार, उपयोग आणि व्यवस्थापन..!

किसानवाणी | निसर्गामध्ये काही कीटक शेतकऱ्यांचे मित्र तर काही शत्रु असतात. या शत्रू किडी पिकांचे… Read More

May 10, 2022

PM Kisan : घरबसल्या eKYC बंद, ‘असा’ आहे नवा नियम; 11 वा हप्ता लवकरच खात्यावर जमा

नवी दिल्ली | पंतपधान किसान सन्मान निधी योजनेच्या (Prime Minister Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थी… Read More

April 6, 2022

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज

किसानवाणी | भारताची अर्थव्यवस्था शेती क्षेत्रावर अधिक अवलंबून आहे. शेती क्षेत्राला भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा… Read More

January 22, 2022

दिवसाला 4 हजारापर्यंतची कमाई देणारा शेतीपूरक व्यवसाय; छोट्या मशीन द्वारे मोठा उद्योग तोही घरातूनच!

किसानवाणी : कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थितीने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना त्यांच्या व्यवसायात मोठं नुकसान… Read More

December 31, 2021

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या 50 हजार रुपये प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदानाबाबत महत्वाची बातमी

किसानवाणी | महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन करतेवेळी राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्ज माफ… Read More

December 27, 2021

1 जनवरी 2022 को निश्चितरूप से मिलेगी PM Kisan की दसवी किस्त

किसानवानी : पिछले कुछ दिनों से अफवाहें हैं कि पीएम किसान योजना की 10वीं किस्त… Read More

December 23, 2021