Homeबातमी शेतीचीसोयाबीन विक्री येत्या काळात केव्हा फायदेशिर ठरेल? वाचा बाजाराचे सविस्तर विश्लेषण

सोयाबीन विक्री येत्या काळात केव्हा फायदेशिर ठरेल? वाचा बाजाराचे सविस्तर विश्लेषण

किसानवाणी : देशातील सोयाबीन बाजार सध्या सोयापेंड आणि सोया तेला भोवती फिरत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात तेजी आहे, मात्र स्थानिक दर देखील चढे आहेत. बुधवारी काही बाजारसमित्यांमध्ये दर स्थिर होते, तर काही बाजारसमित्यांमध्ये दरात १०० ते २०० रूपये प्रति क्विंटल वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री बाजाराचा कल पाहून टप्प्या टप्प्याने करावी. 

यंदा देशातला सोयाबीन हंगाम उशीरा सुरू झाला. पिक नुकसान आणि शेतकऱ्यांनी माल शिल्लक ठेवल्याने दर सुधारल्याचे पहायला मिळत आहे. बुधवारी अकोला बाजारसमितीत सर्वाधिक दर ८००० रूपयांपर्यंत गेल्याचे पहायला मिळाले. तर सरासरी दर ७१५० रूपये होता. लातूर बाजारसमितीत सरासरी दर ६७०० रूपये होता, वाशिम बाजारसमितीत ६००० रूपये तर हिंगोली बाजारसमितीत ६२०० रूपये दर मिळालाय. इंदोर बाजारात सरासरी दर ६७०० रूपये, निमच येथे ६६०० रूपये तर सिहोर येथे ६३०० रूपये दर होता. 

हेही वाचा – सोयाबीनचे दर १० हजार प्रतिक्विंटल होणार? सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय

यंदा सोयाबीनची आवक ही संयमीत आणि टप्प्या टप्प्याने येत होती. मागच्या वर्षी तुटवडा असल्याने शिल्लक साठा काहीच नव्हता. त्यामुळे ही पाईपलाईन पुर्ण भरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी टप्प्या टप्प्याने विक्री सुरू ठेवल्याने दर किफायती पातळीवर आले आहेत. ऐन हंगामात बाजारभाव ६००० रूपयांच्या वर असणे ही तशी चांगली बाब आहे. या पातळीवर माल टप्प्या टप्प्याने विकायला पाहिजे. कारण एक्सपोर्टसाठी देखील पॅरिटी मिळणे गरजेचे आहे. अन्यथा एक्सपोर्ट डिस्पॅरिटीत जाण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे माल पुढे जात नाही. सोयाबीनचे बाजारभाव हे सोया डिओसी आणि ऑईल या दोन कमोडिटीवर ठरतात. आणि या दोन इंटरनॅशनल कमोडिटीच्या ज्या प्राईस पॅरिटी आहेत त्या बाजारभाव पडतळ किंवा स्थानिक बाजाराशी सुसंगत असला तर सर्व गोष्टी चांगल्या घडून येतात. त्यामुळे यंदा सोयाबीनची उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी याचा विचार करून शेतकऱ्यांनी टप्प्या टप्प्याने विक्रीची जी निती अवलंबली आहे ती योग्य आहे. १२ महिन्यांचे १२ टप्पे ही स्ट्रॅटेजी देखील चांगली आहे. कारण जागतिक बाजारात केव्हा काय होईल सांगता येत नाही. कारण हे हवामान आधारित पिक आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पॅनिक सेलिंग न करणे तसेच जास्ती होल्ड पण न करणे गरजेचे आहे. कारण एकदम होल्ड करून ठेवलेला माल एकदमच बाजारात येतो आणि त्याचा विपरित परिणाम दरांवर होतो. त्यामुळे ४ -५ टप्प्यात सोयाबीन विकणे ही चांगली रणनिती आहे. मागच्या हंगामात सोयाबीन मध्ये आलेली तेजी पाहून यंदा शेतकऱ्यांनी सावध विक्री सुरू केलीय. परिणामी आवक कमी होऊन दरात सुधारणा झाली आहे. तसेच सोयाबीनच्या वायदे बाजारात देखील सुधारणा झाल्याचे पहायला मिळत आहे.
दीपक चव्हाण, शेतमाल बाजार अभ्यासक

देशात एक स्पटेंबर पासून २३ नोव्हेंबरपर्यंत सोयाबीनची १८ लाख १५ हजार टन आवक झाली आहे. तर मागील वर्षी याच काळात १७ लाख ४९ हजार टन आवक झाली होती. मागील वर्षी सोयाबीनचे दर १० हजार पर्यंत मिळाले होते. त्यामुळे यंदाही तसेच दर मिळतील या आशेने शेतकऱ्यांनी माल विक्री कमी केली आहे. त्यातच उत्पादनात घट झाल्याने दरही वाढले आहेत. यंदा सोयाबीन उत्पादन ९५ लाख टनांपेक्षा जास्त नसावे असा अंदाज आहे. परंतु सध्याची तेजी जस्टीफाय नाही. कारण आंतरराष्ट्रीय बाजार फारसा वाढलेला नाही. सध्या सीबॉटवर सोयापेंड ३९२ प्रतिटन आहे.  तर भारतीय सोयापेंड ७८० ते ८२५ डॉलरच्या दरम्यान आहे. त्यामुळे या दरात निर्यात शक्य नाही. सध्या स्थानिक मागणीवरच बाजार अवलंबून आहे. परंतु बाजारातील फंडामेंटल्स पाहता, दर या दरम्यानच राहतील. या टप्प्यावर बाजारात ४०० ते ५०० रूपयांच्या सुधारणेची अपेक्षा आहे. त्यामुळे बाजारातील चढ उतार लक्षात घेता शेतकऱ्यांनी काही माल विकल्यास फायदेशिर ठरू शकते.
गौरव कोचर, सोयाबीन व्यापारी, मध्यप्रदेश
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments