राष्ट्रीय पुरस्कारात महाराष्ट्रातील शाहू, दत्त शिरोळ, जवाहरसह अनेक साखर कारखान्यांची बाजी


किसानवाणी : देशातील साखर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येऊन हे पुरस्कार दिले जातात. सदर पारितोषिक वितरण सोहळा १६ नोव्हेंबर २०२१ रोजी एन.सी.यु आय.च्या नवी दिल्ली येथील सभागृहात होणार आहे

ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वात जास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रात उच्चतम कामगिरी करणाऱ्या सहकारी साखऱ कारखान्यांचे केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीव्दारे मुल्यमापन होते. २०२१ साठी निश्चित केलेल्या २१ पारितोषिकांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी आज घोषणा केली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

यंदाच्या(२०२१) वर्षीच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशातून १०८ सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. त्यात महाराष्ट्र (४६), उत्तर प्रदेश( १३), तामिळनाडू (११) , हरियाणा (१०) , गुजरात (१०) ,पंजाब ( ९) कर्नाटक (७) आणि मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश (प्रत्येकी एक) सहभागी झाले होते.


राष्ट्रीय पारितोषिकांचा तपशील
उत्कृष्ट ऊस उत्पादकता – उच्च उतारा विभाग
प्रथम – श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ, कोल्हापूर (महाराष्ट्र)
व्दितीय – राजारामबापू पाटील स.सा.का. सांगली (महाराष्ट्र)

तांत्रिक कार्यक्षमता : उच्च उतारा विभाग 
प्रथम – विघ्नहर स.सा.का. पुणे (महाराष्ट्र), 
द्वितीय – डॉ. पतंगराव कदम सोनहिरा स.सा.का. सांगली (महाराष्ट्र).

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन :  उच्च उतारा विभाग
प्रथम – श्री नर्मदा खाण्ड उद्योग मंडळी ली.गुजरात,
द्वितीय – श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी ली. बारडोली, गुजरात.

विक्रमी ऊस गाळप – उच्च उतारा विभाग 
जवाहर शेतकरी स सा.का. कोल्हापूर, महाराष्ट्र

विक्रमी ऊस उतारा
अजिंक्यतारा स.सा. का. सातारा, महाराष्ट्र.

अत्युत्कृष्ट साखर कारखाना – उच्च उतारा विभाग
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, कागल, कोल्हापूर.

विक्रमी साखर निर्यात
प्रथम – विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना ली ,पिंपळनेर
द्वितीय – सह्याद्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना ली.सोलापूर

उर्वरित विभाग : उत्कृष्ट ऊस उत्पादकता
प्रथम – दि कैथल सहकारी साखर कारखाना, हरियाणा
द्वितीय – किसान शेतकरी चिनी मिल्स ली.नाजीबाबाद, उत्तर प्रदेश

तांत्रिक कार्यक्षमता
प्रथम – दि शहाबाद सहकारी चिनी मिल्स, हरियाणा
द्वितीय – दि किसान सहकारी चिनी मिल्स ली.साथिऑन,आझमगड, उत्तर प्रदेश.

उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन
प्रथम – डी.एस ८ सुब्रमण्या शिवा सहकारी साखर मिल्स ली. तामिळनाडू.
द्वितीय – श्री नवलसिंग सहकारी  शक्कर कारखाना मर्यादित ,बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश.

विक्रमी ऊस गाळप
रामाला सहकारी चिनी मिल्स ली. उत्तर प्रदेश

विक्रमी ऊस उतारा
दि किसान सहकारी चिनी मिल्स ली. गजरौला, उत्तर प्रदेश

अत्युत्कृष्ट  साखर कारखाना, उर्वरित विभाग
कल्लाकुरीची २  सहकारी साखर मिल्स ली.तामिळनाडू

कोविड परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या वर्षीचा व गतवर्षीचा पारितोषिक वितरण सोहळा नवी दिल्ली येथे एकत्रित होत आहे. या एकत्रित पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी  राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल तसेच साखर उदयोगाशी संबंधित महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू,मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यातील मंत्री  व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती दांडेगावकर यांनी दिली.

एकूण २१ पारितोषिकात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकाविला असून त्याला १० पारितोषिके मिळाली आहेत तर दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशाला चार पारितोषिके प्राप्त झाली. गुजरात, हरियाणा व तामिळनाडूने प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली तर मध्य प्रदेशाला एक मिळाले. यंदाच्या वर्षाचे संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना ली. सोलापूर यास मिळाले.