Saturday, January 28, 2023
HomeAnimal Husbandryउन्हाळ्यात 'अशी' घ्या जनावरांची काळजी

उन्हाळ्यात ‘अशी’ घ्या जनावरांची काळजी

किसानवाणी : उन्हाळा सुरू झाला की त्याचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. संकरीत गाईंच्या दूध उत्पादनात घट होऊ शकते, तसेच प्रजनन क्रियेवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अशा दिवसात उन्हाचा त्रास झाल्यास जनावरे कमी चारा खातात तसेच पाणीही कमी पितात त्याचा जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पण उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांच्या चारा-पाण्याचे आणि आरोग्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास उन्हाळा जनावरांसाठी सुखकर होण्याबरोबरच नुकसान ही टाळता येते. 

  • गाईंना 24 तास स्वच्छ, थंड व वास न येणाऱ्या पाण्याची व्यवस्था करावी व आठवड्यातून एकदा पाण्याच्या हौदाला आतून पांढरा चुना लावावा, त्यामुळे शेवाळाची वाढ थांबवता येते आणि पाणीही थंड राहण्यास मदत होते.
  • ओल्या चाऱ्याची व्यवस्था करावी व जास्त प्रमाणात ओला चारा गाईंना द्यावा. कोरडा चारा संध्याकाळी जेव्हा वातावरण थंड असते तेव्हा भरपूर प्रमाणामध्ये द्यावा.
  • गाईंना सावलीची व्यवस्था करावी. शक्य असल्यास त्यांना झाडाखाली थंड सावलीत बांधावे.
  • गोठ्याच्या छताची उंची जास्त असावी. छतावर पालापाचोळा पसरावा जेणेकरून गोठ्याच्या आतले वातावरण थंड राहील किंवा छताला पांढरा चुना लावावा.
  • गोठ्यात पंखे, फॉगर्स बसवावेत किंवा ते शक्य नसेल तर गाईंच्या अंगावर दिवसातून 2 – 3 वेळा स्प्रे पंपाने पाणी मारावे.
  • जास्त तापमाणामुळे गाई व म्हैशी व्यवस्थित माजाची लक्षण दाखवत नाहीत, त्यामुळे गाई म्हैशींवर व्यवस्थित लक्ष ठेवावे. तसेच जास्तीत जास्त गाई म्हैशी उन्हाळ्याच्या अगोदरच गाभण कशा राहतील याचा प्रयत्न करावा.
  • म्हैशींचा रंग काळा असल्याने म्हैशींना उन्हाचा जास्त त्रास होतो; त्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे.
  • गाईंना खुराक हा सकाळी लवकर व संध्याकाळी द्यावा कारण दुपारी किंवा सकाळी उशीरा खुराक दिल्यावर 3 – 4 तासांनी त्याची पचनक्रिया चालू होते; त्यावेळी गाईंच्या शरीरात उर्जा निर्माण होते व शरीराचे तापमान वाढते.
  • गोठ्याच्या बाजूला झाडे लावावीत जेणेकरून भविष्यात त्याचा फायदा होईल.
  • शक्य असल्यास गुळाचे पाणी पाजावे; त्यामुळे गाईंच्या शरीरात थंडावा निर्माण होतो.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments