गांडूळ खत निर्मितीचे मार्केटमधील सर्वात स्वस्त युनीट; सोबत घरपोच सेवा आणि मार्गदर्शनही!

किसानवाणी :
अधिक माहितीसाठी हा व्हीडीओ पहा.. खालील लिंकवर क्लिक करा
(गांडूळ खत निर्मितीचे मार्केटमधील सर्वात स्वस्त युनीट; सोबत घरपोच सेवा आणि मार्गदर्शनही!)

सध्या बाजारात अनेक कंपन्या शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मीतीसाठी एचडीपीई तंत्रज्ञानाने बनवलेल्या मटेरिअलचा पुरवठा करतात. परंतु यापैकी बहुतांशी कंपन्या नफा मिळवण्याच्या उद्देशाने हे काम करत असल्याचे दिसते. याउलट कोल्हापूर जिल्ह्यातील ‘पद्मावती सिडस्’ या कंपनीने शेतकऱ्यांची गरज ध्यानात घेऊन कमीकमी खर्चात शेतकऱ्यांना ही सेवा घरपोच देण्याचे व्रत अंगिकारले आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इतर कंपन्यांच्या तुलनेत हे सर्वाधिक स्वस्त युनीट असून व्हर्मी कंपोस्ट बेड, गांडूळ बीज याची घरपोच सेवा आणि युनीट उभारणीचे संपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. याबरोबरच ज्यांना व्यावसायिक पध्दतीने गांडुळ खत निर्मिती करायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी देखील पद्मावती सिडस् महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात हे प्रकल्प उभा करून देत आहे.