Saturday, January 28, 2023
HomeGovt. schemeपीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांच्या खात्यात एप्रिलच्या 'या' तारखेपासून जमा होणार 'आठवा' हप्ता

पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांच्या खात्यात एप्रिलच्या ‘या’ तारखेपासून जमा होणार ‘आठवा’ हप्ता

किसानवाणी : पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून आनंदाची बातमी असून योजनेतील आठवा हप्ता जमा केला जाणार आहे. देशातील जवळपास ११ कोटी ७७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार असून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात २००० रूपये जमा होणार आहेत. नवीन आर्थिक वर्षानुसार हा हप्ता आजपासून (१ एप्रिल २०२१) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी सरकारी पातळीवर तयारी पूर्ण झाली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च पूर्वी पीएम किसान योजनेत रजिस्ट्रेशन केले आहे आणि अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात २००० चे दोन हप्ते म्हणजेच ४००० रूपये जमा केले जाण्याचीही शक्यता आहे. नवीन आर्थिक वर्षानुसार पीएम किसान योजनेचा यंदाच्या वर्षातील हा पहिला हप्ता असून २०१९-२० पासून आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ७ हप्ते जमा करण्यात आले आहेत. सर्वच लाभधारकांच्या खात्यात जरी सात हप्ते जमा झाले नसले तरी सुरवातीपासून ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे, त्यांच्या खात्यात ७ हप्ते नक्कीच जमा झाले आहेत. यापूर्वीचा सातवा हप्ता २५ डिसेंबर २०२० रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेत अद्याप रजिस्ट्रेशन केलेले नाही असे शेतकरी स्वतः या योजनेत आपले नाव नोंद करू शकतात. तसेच ज्यांनी नोंद केलेली आहे परंतु त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही असे शेतकरी देखील योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती अपडेट करू शकतात. त्यासाठी www.pmkisan.gov.in वेबसाईटवर जाऊन माहिती अपलोड करावी लागेल. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments