Homeयोजनाशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; PM Kisan योजनेच्या निधीत दुप्पट वाढ?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; PM Kisan योजनेच्या निधीत दुप्पट वाढ?

किसानवाणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM kisan Samman Nidhi) योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार लवकरच आनंदाची बातमी देण्याची शक्यता आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच २००० रुपयांच्या ऐवजी ४०००  रूपये मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी सरकार लाभार्थी शेतकऱ्यांच्या निधीत वाढ करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी रक्कम दुप्पट करण्याच्या विचारात आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांऐवजी तीन हप्त्यांमध्ये १२ हजार रुपये मिळू शकतात. रिपोर्टनुसार, बिहारचे कृषीमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची दिल्लीत भेट घेऊन पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रक्कम दुप्पट करण्यासंदर्भात चर्चा केली. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नसला तरी लवकरच याबाबतीत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

Boston BrushCutter BC-139F- 4 Stroke (Heavy Duty + Attachments)

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये पाठविले जाते. प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये असे प्रत्येक ४ महिन्यांनी एक हप्ता देण्यात येतो. २०१९ मध्ये ही योजना मोदी सरकारने सुरू केली आहे. २६ फेब्रुवारी २०१९ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवणयास सुवात करण्यात आलीय. 

या योजनेच्या लिस्टमध्ये असे तपासा तुमचे नाव : 
१) सर्वात आधी तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. २) वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला Farmers Corner चा ऑप्शन दिसेल.३) Farmers Corner सेक्शनमध्ये तुम्हाला Beneficiaries List च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. ४) त्यानंतर तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल.५) यानंतर, तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसून येईल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

Dyno Mototive Acid Pump 20L Knapsack Manual Sprayer for Agriculture and Sanitizering Sprayer
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments