‘या’ वनस्पतीचं तेल विकलं जातयं तब्बल १२ हजार ५०० रू. लिटर; तुम्हीही करू शकता याची शेती..!

किसानवाणी :
जगात अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांची किंमत बाजारपेठेत खूपच आहे. ‘जिरेनियम’ ही वनस्पती यापैकीच एक असून सुगंधी उत्पादनांमध्ये या वनस्पतीच्या तेलाला सर्वाधिक मागणी आहे. आपण वापरत असलेल्या दैनंदिन सौंदर्यप्रसाधनांमध्ये जिरेनियम वनस्पतीचे तेल सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते. तसे पाहायला गेल्यास भारतीय बाजारपेठेतील जिरेनियम तेलाची गरज भागवण्यासाठी परदेशातून हे तेल मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. परंतु भारतात देखील याची लागवड यशस्वीरित्या केली जाऊ शकते हे इथल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. यापैकीच एक आहेत नाशिक जिल्ह्यातील चंद्रशेखर लभडे..

नाशिक जिल्ह्यातील आडगावच्या चंद्रशेखर लभडे यांनी तब्बल १२ एकरांवर जिरेनियमची यशस्वीरित्या लागवड केली असून ते स्वतः तेलनिर्मिती देखील करतात. त्यांच्या ‘फार्म टू बॉटल’ या संकल्पनेमुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील आता जिरेनियम शेतीकडे वळू लागले आहेत. जिरेनियम शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पतीवर फारसे किड रोग येत नाहीत. कोणतेही जनावरं याचा पाला खात नाही. तसेच जिरेनियम वनस्पतीच्या तेलाला शाश्वत बाजापेठ उपलब्ध आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जिरेनियम लागवडीकडे व्यावसायिक शेतीच्या दृष्टिकोनातून वळल्यास पारंपारिक पिकांपेक्षा अधिक उत्पन्न या शेतीतून नक्कीच मिळणार आहे.

जिरेनियम शेतीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी चंद्रशेखर लभडे यांची ही यशोगाथा पाहूया…
खालील लिंक क्लिक करून व्हीडीओ पहा..