Homeयोजनाकुक्कुटपालन करायचं आहे? मग ही बातमी नक्की वाचा..!

कुक्कुटपालन करायचं आहे? मग ही बातमी नक्की वाचा..!

किसानवाणी :
दिवसेंदिवस चिकन आणि अंड्यांची मागणी वाढत असल्याने देशातील कुक्कुटपालन उद्योगाची वाटचाल जोडव्यवसायाकडून प्रमुख व्यवसायाच्या दिशेने झाली आहे. सध्या कुक्कुटपालन लहान स्तरापासून मोठ्या व्यावसायिक स्तरापर्यंत करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. या व्यवसायातील वाढता रोजगार आणि त्यातील संधी यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार देखील कुक्कुटपालन व्यवसायाला मदत करत आहे. यासाठी गरजेनुसार प्रशिक्षण देणे, कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देणे, शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन उपलब्ध करून देणे यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

सध्या पोल्ट्री फार्मिंग करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज भासते, अशा वेळी देशातील विविध सरकारी बॅंका या व्यवसायासाठी कर्ज देखील उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर नाबार्डच्या कुक्कुटपालन योजनेअंतर्गत यातील प्रकल्पांना २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदानदेखील दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी पातळीवरील प्रोत्साहनाबरोबरच भांडवल उभे करणे देखील सहज शक्य होते. यामध्ये प्रामुख्याने स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयडीबीआय, पंजाब नॅशनल बॅंक, बॅंक ऑफ इंडिया तसेच इतर बॅंकांचाही समावेश आहे. 

देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या माध्यमातून पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. SBI ने यासाठी ‘ब्रॉयलर प्लस योजना’ आणली आहे. या योजनेतून ५००० पक्ष्यांसाठी ३ लाख रूपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तर एका व्यक्तीस साधारणपणे ९ लाखापर्यंतचे कर्ज मंजूर केले जाते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हे कर्ज मिळवणे सोपे आहे. हे कर्ज फेडण्याचा कालावधी पाच वर्ष असून आपल्या जवळच्या शाखेत याविषयी अर्ज करता येतो.

पशुधन उत्पादन प्रणालीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक सुधारणा करण्यासाठी तसेच सर्व हितसंबंधी लोकांची क्षमता विकसित करण्यासाठी 2014-15 च्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Mission – NLM) सुरू करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून कुकुटपालन व्यवसायास देखील प्रोत्साहन दिले जाते. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments