Saturday, January 28, 2023
HomeWeatherकोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाचा अंदाज; तर 'या' तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाचा अंदाज; तर ‘या’ तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

किसानवाणी : भारतीय हवामान वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार २० जुलै ते २४ जुलै दरम्यान अतिपावसाची शक्यता आहे. या कालावधीतील २१ व २२ जुलै रोजी रेड अलर्ट तर २३ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिदिन ७०-१५० मिमी पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, आजरा, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा आणि भुदरगड या तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या कालावधीत अतिपावसामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ संभवते. तसेच डोंगराळ भागात भूसख्खलन, अथवा दरडी कोसळणे, जुन्या घरांची पडझड होणे अशा घटना घडू शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments