Homeहवामानहवामान अंदाज : ७ मे २०२१ ते १३ मे २०२१

हवामान अंदाज : ७ मे २०२१ ते १३ मे २०२१

किसानवाणी : राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण असल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाडा ते मध्यप्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचे रूपांतर चक्रीय वाऱ्यात होण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील पाच ते सहा दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विविध ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ व कोकण परिसरात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

शनिवार ७ मे २०२१ ते गुरूवार १३ मे २०२१ पर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी ही लिंक क्लिक करा – Weather Forcasting 7 May 2021 to 13 May 2021

कर्नाटकच्या उत्तर भागात सध्या चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्याने राज्यातील वातावरण बदलत आहे. यामुळे काही भागात आकाश निरभ्र तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. उत्तर कर्नाटक व परिसर ते दक्षिण केरळ व किनारपट्टी दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीय वाऱ्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच गुजरातच्या उत्तर भागातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. पूर्व पश्‍चिम असलेल्या मध्य प्रदेश ते त्रिपुरा, झारखंड, पश्‍चिम बंगालदरम्यान देखील कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्राचा आग्नेय भाग आणि मालदिव परिसरात चक्राकार वारे वाहत आहे. यासर्व बदलांमुळे राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments