किसानवाणी :
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये रविवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे सध्या पाऊस पडत आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
येथे क्लिक करा : — हवामान अंदाज १३ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२०
आज सकाळपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, वसई-विरार, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने सुरवात केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईत पुढचे ३ ते ४ तास असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यातील उत्तर कोकणातही ढगाळ वातावरण असून पुढच्या ३-४ तासांमध्ये याठिकाणी देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे. याबरोबरच पुढच्या २४ तासांत मुंबई, पुण्यासह नागपूर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.