राज्यात पावसाचं कमबॅक.. ‘या’ जिल्ह्यांना यलो ॲलर्ट

किसानवाणी : भारतीय हवामान विभागाने १९ ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज जारी केलाय. यामध्ये हवामान विभागानं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट दिला आहे. तर, 19 ऑगस्टला कोणताही ॲलर्ट देण्यात आलेला नाही. काही दिवसांच्या उघडीपीनंतर सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.

राज्यातील पावसाची स्थिती ‘या’ तारखांना अशी राहिल..
हवामान विभागानं आजच्या (१५ ऑगस्ट) दिवसासाठी कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, मुंबई, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट दिला आहे. तर १६ ऑगस्ट रोजी सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट दिला आहे. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागानं १७ ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे. तर १८ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, रायगड, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याला यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.