Homeहवामानहवामान अंदाज : 'या' ठिकाणी पावसाची शक्यता

हवामान अंदाज : ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

किसानवाणी
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राजधानी दिल्लीत 3 आणि 4 फेब्रुवारीला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर येत्या 24 तासांत उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या काही भागात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी शीतलहरीची परिस्थिती 24 ते 48 तास कायम राहण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि लडाखमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

पर्वतीय राज्यात 3 फेब्रुवारीपासून पाऊस आणि हिमवृष्टीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीपासून पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम आणि मध्य प्रदेश, उत्तर राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात गारपीटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments