Homeहवामानहवामान अंदाज : 'या' जिल्ह्यात पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

हवामान अंदाज : ‘या’ जिल्ह्यात पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता

किसानवाणी : वातावरणातील बदलामुळे सध्या मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून बुधवारपासून पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून वादळी वारे, गारपीटीसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह, विजांसह गारपीट होण्याचा अंदाज आहे. यावेळी ३० ते ४० कि.मी. ताशी वारे वाहण्याची शक्यता असून रत्नागिरी सातारा, सांगली कोल्हापूर, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात दिवसभर उन्हाचा चटका आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण अशी काहीशी स्थिती राहत आहे. मध्यरात्रीनंतर पुन्हा हवेत गारवा तयार होत असल्याने किमान तापमानात किंचित घट होत आहे. मागील दोन दिवसांत राज्यातील सर्वच भागांत ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीने अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. विदर्भातही पारा चांगलाच घटल्याने कमाल तापमानात पुन्हा चांगलीच घसरण झाली आहे. सोमवारी (ता. ३) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४१.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. 

गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोमोरीन परिसर व दक्षिण तमिळनाडू परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच मध्य प्रदेश व परिसरात व वायव्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तर मध्य प्रदेशचा वायव्य भाग ते मणिपूर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. 

याशिवाय उत्तर कर्नाटक ते कोमोरिन परिसर, दक्षिण तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने भूपृष्टावर येत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भ काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. त्यामुळे मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात गारपीटीसह जोरदार पाऊस पडत आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments