हवामान : कोकणात ऑरेंज अलर्टचा इशारा

किसानवाणी : गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात चांगलाच बदल झालाय. काही भागात उन्हासह ढगाळ वातावरण आहे. यामुळे पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे.

सध्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. येत्या शुक्रवारपासून कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबई, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून आँरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम व विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे.
सविस्तर हवामान वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. (IMD Weather)

Kisanwani: