Your Page!

मागील आठवड्यापासून कापसाचे भाव पुन्हा कमी झाल्याचे पहायला मिळत आहे.

बाजारांमध्ये कापूस दरात क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांपर्यंत घट झाली आहे. 

बाजारांमध्ये कापूस दरात क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांपर्यंत घट झाली आहे. 

दरवाढीची प्रतिक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात यामुळे भीती निर्माण झाली आहे. 

जाणकारांच्या मते सध्या कापूस दरात घसरण होत असली तरी, पुढील आठवडाभरानंतर दर वाढतील असा अंदाज आहे.

देशातील बाजारात मागील आठवड्यात कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार रुपये दर मिळत होता. 

सध्या कापसाला ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय. म्हणजेच दरात ५०० रुपयांपर्यंत घट झाली.

सध्या बाजारात अफवा असली तरी कापसाचे भाव पडणार नाहीत. शेतकऱ्यांनी विक्री मर्यादीत ठेवल्यास कापसाचे दरही टिकून राहतील.

यंदा शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरल्याने दरात आणखी घसरण होणार नसल्याचे, सीआयएचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले.

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर कापूस दरात सुधारणा होऊ शकते असा जाणकारांचा अंदाज आहे.

मार्च महिन्यापर्यंत कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते.

कापूस दर ९ हजारांच्या पुढे गेल्यानंतर विक्रीचा निर्णय घेण्याचं आवाहनही कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

कापूस दर ९ हजारांच्या पुढे गेल्यानंतर विक्रीचा निर्णय घेण्याचं आवाहनही कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.