Homeबातमी शेतीचीयंदाच्या हंगामात तूरीचे दर काय राहतील? देशातील एकूण तूर उत्पादन आणि त्यावर...

यंदाच्या हंगामात तूरीचे दर काय राहतील? देशातील एकूण तूर उत्पादन आणि त्यावर आयातीचा काय होणार परिणाम? वाचा सविस्तर

किसानवाणी : देशात तूर उत्पादनात महाराष्ट्र आणि कर्नाटक ही आघाडीची राज्ये आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये जवळपास ५० टक्के तूरीचे क्षेत्र आहे. नेमके याच राज्यांमध्ये तूर पिकाचे पावसाने मोठे नुकसान झाले आहे. लागवडीनंतर १५ जून ते १५ जूलैच्या दरम्यान पावसाने ओढ दिल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम झाला. तर ऑगस्ट महिन्यात अनपेक्षितरित्या पावसाचे प्रमाण वाढल्यानेही पिकाला मोठा फटका बसला. 

गेल्या आठवड्यात अकोला जिल्ह्यात झालेल्या पावसाने तूर पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे पहायला मिळाले. तेल्हारा, अकोट, पातूर, मुर्तिजापूर या तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर अमरावती, वाशिम जिल्ह्यातही अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याचे पहायला मिळाले. मराठवाड्यातील अनेक भागात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कर्नाटक राज्यात देखील तूर पिकाला मोठा फटका बसला आहे. यासर्व परिस्थितीमुळे उत्पादनात १० ते १५ टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

केंद्र सरकारच्या पहिल्या आगाऊ पिक उत्पादनाच्या अहवालात, तूरीचे ४४ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी दुसऱ्या अंदाजात स्पष्ट होणार आहे. केंद्र सरकारने तूर आयातीसाठी म्यानमार आणि मलावी बरोबर पंचवार्षिक करार केले आहेत. सध्या मान्यमार मधील तूर ६४०० रूपये प्रतिक्विंटल या भावाने घेतली आहे. गेल्या काही दिवसात म्यानमार मधील बाजारात तुरीच्या दरात सुधारणा झाल्याने या दरात आयात करण्यास भारतीय व्यापारी तयार नाहीत. येत्या दोन – तीन महिन्यात बाजारात नवीन तूर येणार असल्याने भारतीय व्यापारी या तूरीची वाट पाहत असल्याचे तेलंगणामधील एका कृषि विद्यापिठाने आपल्या अहवालात म्हणटलं आहे.   

यंदा तूरीला ६३०० रूपयांची MSP जाहीर करण्यात आली आहे. तर राज्यातील सध्याचे दर हे ६००० रूपये प्रतिक्विंटलच्या आसपास आहेत. त्यामुळे येत्या काळात तुरीचे दर किमान आधारभावाच्या जवळपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments