Homeबातमी शेतीचीयंदाच्या हंगामात कापसाचे दर काय राहतील? जाणून घ्या राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय मागणीचा...

यंदाच्या हंगामात कापसाचे दर काय राहतील? जाणून घ्या राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय मागणीचा परिणाम आणि दराचे विश्लेषण

किसानवाणी : यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याला कापूसही अपवाद नाही. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये झालेल्या पावसामुळे यंदा कापूस उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता आहे. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरील विचार केला तर यंदा कापसाची मागणी वाढणार असल्याने दरही तेजीत राहतील, असा अंदाज जुनागड कृषी विद्यापीठाने कापूस दर अंदाज अहवालात व्यक्त केला आहे.

कापूस दर अंदाजात, मागच्या वर्षीचा विचार केला तर देशात १३१ लाख हेक्‍टर कापूस लागवड होती. यंदा कापूस लागवड जास्त असलेल्या भागात पावसाचा खंड, कमी पाऊस इत्यादी कारणांमुळे  मागच्या वर्षीच्या तुलनेत कपाशीचे लागवड क्षेत्र १२४ लाख हेक्‍टरवर आले आहे. अगोदरच लागवड क्षेत्रात घट आणि त्यातच पावसाने केलेले कपाशी पिकाचे नुकसान यामुळे कापूस उत्पादनात घट येईल असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

गुजरात राज्याचा विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत याहीवर्षी २२.५६ लाख हेक्‍टरवर कापूस लागवड झाल्यामुळे गुजरात राज्यातील कापूस उत्पादन स्थिर राहील असे अहवालात म्हटले आहे. तसेच ८०.९५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज सरकारने व्यक्त केला. मागच्या वर्षी ७२.७ लाख गाठी कापूस उत्पादन होते. यावर्षी यामध्ये आठ लाख गाठींची वाढ सरकारला अपेक्षित आहे.

कापसाच्या दराबद्दल जुनागड कृषी विद्यापीठाने म्हटले की, या वर्षी सरकारने लांब धाग्याच्या कापसासाठी सहा हजार पंचवीस रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र जागतिक कापूस मागणी वाढल्याने दराला असलेला आधार आणि देशातील कापूस उत्पादनातील कमालीची घट यामुळे दर हमीभावापेक्षा जास्तच राहतील. यामध्ये कापूस निर्यातीच्या संधी आणखी वाढल्या आणि जागतिक कापूस वापर असाच चांगला राहिला तर पुढील काळात दर आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments