यंदाच्या हंगामात सोयाबीनचे दर किती राहतील? जाणून घ्या मार्च २०२२ पर्यंतच्या बाजारभावाचे विश्लेषण

किसानवाणी : मागच्या हंगामात सोयाबीनच्या तेजीने साठेबाज मालामाल झाल्याचे चित्र शेतकऱ्यांना पहायला मिळाले. त्यामुळेच शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी भाबडी आशा होती. परंतु केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फेरले आहे. 

येत्या काळात सरकारने सोयाबीनच्या आयात निर्यातीच्या बाबतीत हस्तक्षेप केला नाही तर दर किमान पातळीवर कायम राहतील. देशातील सोयाबीन मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता, शेतकऱ्यांनी घाईने विक्री न केल्यास एफएक्यू सोयाबीनला किमान ४८०० ते ५५०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची अपेक्षा आहे. मार्च महिन्यापर्यंत विक्रीची घाई केली नाही तर या दरम्यानच्या काळात दर ६००० रूपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केलीय. (किसानवाणीचे युट्यूब चॅनल पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा)

खाद्य तेलांच्या किंमती कमी करण्याच्या नावाखाली केंद्रसरकारने शेतकऱ्यांचा विचार न करता मागच्या तीन महिन्यात तब्बल ५ वेळा धोरणात बदल केलाय. एकाच महिन्यात दोन वेळा आयातशुल्क कपात आणि साठामर्यादा लावली. मात्र देशातील मागणी पुरवठ्याचे गणित बघता भविष्यात दर फारसे कमी होतील अशी शक्यता दिसत नाही.  (किसानवाणीचे युट्यूब चॅनल पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा)

भारत हा पामतेलाचा मोठा आयातदार देश आहे. आयात शुल्क कपातीमुळे याचा फायदा मलेशिया आणि इंडोनेशिया या देशाना होतोय. ऑक्टोबरला नोंदवलेल्या वाढीनंतर १४ ऑक्टोबरला मलेशियातील पाम तेलाचे वायदे पूर्वपातळीवर आले आहेत. भारत सरकारच्या निर्णयावर मलेशियातील तेलबाजार कशी प्रतिक्रिया देतात यावर भारतातील तेल दराची दिशा ठरणार आहे. साधारणपणे भारतात पम तेलाच्या आयातशुल्कात कपात होते तेल्हा मलेशियात तेलाचे दर वाढतात. त्यामुळे शुल्क कपातीचा फायदा भारतीय ग्राहकांना होत असल्याचे कधीच दिसत नाही. (किसानवाणीचे युट्यूब चॅनल पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा)

केंद्र  सरकारच्या निर्णयानंतर १३ ऑक्टोबर रोजी एनसीडीएक्स वायदे बाजारात सोयाबीनचे  वायदे २.५ टक्क्यांनी घटल्याचे पहायला मिळाले. तसेच रिफाईंड सोयाबीनच्या वायद्यातही मोठी घट पहायला मिळाली होती. मात्र १४ ऑक्टोबरला ते पूर्वपदावर आले आहेत. सध्या एनसीडीएक्स वरील सोयाबीनचे वायदे ५३०० ते ५५०० च्या दरम्यान आहेत. (NCDX चे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

कृषि अर्थशास्त्र अभ्यासक राजेंद्र जाधव यांच्या मते, आयात झालेल्या ७ लाख टन सोयापेंडेतून पोल्ट्री उद्योगाकडे साधारणत दोन महिन्यांचा साठा असेल, याकाळात बाजारात कमी खरेदी होईल. तर पैशाची निकड असणारे शेतकरी याकाळात सोयाबीनची विक्री करतील. त्यामुळे या काऴात मोठ्या व्यापाऱ्यांकडूनच खरेदी होईल. येत्या काळात सरकारने पॅनिक निर्माण होईल असा कोणताही निर्णय घेतला नाही तर पुढचे दोन महिने तरी दर ५३०० ते ५५०० रूपया दरम्यान भाव राहतील असा अंदाज आहे. आयात सोयापेंड संपल्यानंतर पोल्ट्री उद्योगाला स्थानिक बाजारातूनच खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे मार्च मध्ये सोयाबीन विक्री केल्यास दर ६००० पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. (किसानवाणीचे युट्यूब चॅनल पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा)

इंदोर येथील प्रोसेसरच्यामते, केंद्राने आयात शुल्क कमी केले असेल तरी आंतराष्ट्रीय बाजारात रूपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमुल्यन सुरू आहे. सध्या बाजारात आवक होत असलेल्या मालात आर्द्रता जास्त आहे. तसेच एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनला ४८०० ते ५२०० रूपयापर्यंत दर मिळतोय. हे घटक लक्षात घेता, सरकारने आणखी एखादा निर्णय घेतला किंवा आवकेचा दबाव वाढला तर दर काहीसे दबावात येऊन कमीत कमी ४५०० ते ४८०० रूपयांवर स्थिरावतील. अस्थिर झालेल्या बाजारात काही झाले तरी मिलर्स आणि स्टॉकिस्ट ४५०० रूपयांवर मोठी खरेदी करतील. (किसानवाणीचे युट्यूब चॅनल पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा)

तर बाजारातील जाणकारांच्या मते सरकारने यापुढे कोणताही निर्णय घेतला तरी येत्या काळात सोयाबीन ४५०० रूपयांवर स्थिरावेल. तर सरकारने चांगली पावलं उचलली किंवा कोणताही निर्णय घेतला नाही तर ४८०० ते ५५०० रूपयांपर्यंत दर मिळतील. फेब्रुवारीनंतर हेच दर ६००० रूपयापर्यंतही जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होतेय.  (किसानवाणीचे युट्यूब चॅनल पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा)

शेतमाल बाजारविश्लेषक दिनेश सोमानिया यांच्या मते, अनपेक्षितपणे सरकार निर्णय घेत असून यामुळे व्यापारी आणि उद्योगाची व्दिधा स्थिती झाली आहे. सरकार कोणताही निर्णय घेत असल्याने बाजाराची दिशाच निश्चित झालेली नाही. मात्र खाद्य तेलाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसारच ठरतील. देशातील सोयाबीन बाजाराचा पॅटर्न बघता, शेतकऱ्यांनी एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनचे दर ४८०० रूपयांपर्यंत राहतील हे ध्यानात घ्यावे. सरकारने आयातशुल्क शुन्यावर नेले तर यात आणखी थोडी घसरण होऊ शकते. मात्र शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग न करता, बाजाराचा कल पाहून विक्री करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना ६ हजारांचा दर मिळण्याची अपेक्षा आहे, त्यांनी फेब्रुवरीनंतर सोयाबीनची विक्री करावी.  (किसानवाणीचे युट्यूब चॅनल पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा)