Homeहवामानराज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, राज्यातील संपूर्ण हवामान अंदाज वाचा एका क्लिकवर

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, राज्यातील संपूर्ण हवामान अंदाज वाचा एका क्लिकवर

किसानवाणी : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई आणि नागपूर कार्यालयाद्वारे हा अंदाज जारी करण्यात आलाय. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

राज्यातील संपूर्ण हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी (प्रादेशिक मौसम केंद्र, मुंबई) या लिंकला भेट द्या. (कंसातील अक्षरांवर क्लिक करा)

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
हवामान विभागानं मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस झाल्यास इथल्या शेतकऱ्यांची पिक वाचतील, असं हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी सांगितलं आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे. त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस ही परिस्थिती राहणार आहे. याशिवाय कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

राज्यातील आजचा पावसाचा अंदाज
पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड,परभणी, बीड, हिंगोली, जालना, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आलाय. वरील सर्व जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय.

१७ ऑगस्टला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट
हवामान विभागानं 17 ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

१८ ऑगस्टला कोकण ते विदर्भात पाऊस –
कोल्हापूर सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, बीड, उस्मानाबाद, चंद्रपूर, वर्धा, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments