Homeहवामानहवामान ६ जून २०२१ : संपूर्ण भारतातील सविस्तर अंदाज

हवामान ६ जून २०२१ : संपूर्ण भारतातील सविस्तर अंदाज

किसानवाणी :

केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकच्या दिशेने प्रस्थान केले आहे.  त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. IMD च्या सुधारित अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, लक्षद्विप आणि केरळच्या उर्वरित भागासह दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या भागांना व्यापलं आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातही मान्सून दाखल झाला आहे.

स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार – जम्मू-कश्मीर आणि आसपासच्या भागात पश्चिमी विक्षोभ तयार झाला आहे.  तर पंजाब आणि लगतच्या हरियाणा राज्यातील काही भागांवर चक्रवाती हवामानाचे क्षेत्र तयार झाले आहे. कर्नाटकच्या समुद्र तटीय भागात मध्य अरब समुद्रावर एक चक्रवाती हवेचे क्षेत्र बनले आहे. एक ट्रफ रेषा (जेव्हा ढगांमधे थंड आणि उबदार हवेचे मिश्रण होते तेव्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या प्रणालीतून बाहेर पडणार्‍या पट्टीला ट्रफ रेषा असे म्हणतात. यात हवामानात अचानक बदल होऊन जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतो) महाराष्ट्रातून केरल तटीय प्रदेशापर्यंत तयार झाली आहे. तर चक्रवाती हवेचे क्षेत्र तमिळनाडूच्या अंतर्गत भागात तयार झाले आहे. त्याचबरोबर आणखी एक ट्रफ रेषा मध्य महाराष्ट्रातून दक्षिण तामिळनाडूपर्यंत कर्नाटकच्या अंतर्गत भागातून जात आहे. तर एक चक्रवाती हवामानाचे क्षेत्र दक्षिण बिहार आणि त्या भागातील खालच्या स्तरात तयार झाले आहे.

येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज – 
येत्या चोवीस तासात ईशान्य भारत, केरल तटीय प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोवा, तसेच गुजरात परिसर, दक्षिणपूर्व राजस्थान, तेलंगणा, रॉयलसिमा आदि ठिकाणी हलकी ते मध्यम तर काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता आहे. 
तटीय आंध्र प्रदेश, उर्वरित मध्य प्रदेश, सिक्किम, उप हिमालयी पश्चिम बंगाल, तसेच पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे. 
ओडिशा, छत्तीसगड आणि दक्षिण-मध्य उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर आणि पश्चिमी राजस्थानात धूळीचे वादळ होण्याची शक्यता आहे. 

असा असेल यंदाचा मान्सून –
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदाचा मान्सून सामान्य राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये पर्जन्यवृष्टी ९२% ते १०८% इतकी होऊ शकते. हाच मान्सून दख्खनच्या पठारावर ९३% ते १०८% इतका कोसळू शकतो. याशिवाय उत्तर-पूर्व भारतातही मान्सून दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. उत्तर-पूर्व भारतात ९५% तर मध्य भारतात १०६% इतका पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जुलै महिन्यात पर्जन्यमान कसे राहील याबाबत आयएमडी जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा अंदाज वर्तवणार आहे.

पुढील २ ते ३ दिवसांत कशी असेल महाराष्ट्रातील स्थिती
पुढील २ ते ३ दिवसांत राज्यात बहुतांशी ठिकाणी विजांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ठाणे, रायगड, द. कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, येत्या काही तासात पुण्यासह, बारामती, शिरूर, इंदापूर, रायगड, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि आसपासच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments