Saturday, January 28, 2023
HomeGovt. scheme२ लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल नवाब मलिकांनी स्पष्ट केली...

२ लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल नवाब मलिकांनी स्पष्ट केली राज्य सरकारची भूमिका..

किसानवाणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला २ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सरकारच्या कामांची यादी वाचून दाखवली. यात त्यांनी २ लाख रुपयांपर्यंतचं १०० टक्के कर्ज माफ केल्याचाही उल्लेख केला. यावेळी त्यांनी २ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेले शेतकरी आणि ज्यांनी नियमितपणे कर्ज फेडलं त्यांच्याबाबत निर्णय कधी घेणार यावरही भाष्य केलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

नवाब मलिक म्हणाले, “मागच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, पण ३ वर्षे त्यांना कर्जमाफी करता आली नाही. त्यांनी केवळ घोळ निर्माण केला. शेतकरी आंदोलन करत राहिले. या शेतकऱ्यांना त्यांना न्याय देता आला नाही. आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली. शेतकऱ्यांनी जे २ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले होते ते २ महिन्याच्या आत १०० टक्के कर्जमाफी केली. जवळपास २० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालं.”

२ विषय प्रलंबित राहिलेत. २ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेतलं होतं त्यांनाही आश्वासन देण्यात आलंय. भविष्यात या शेतकऱ्यांचाही विचार होणार आहे. त्याचबरोबर ज्यांनी नियमित कर्जफेड केली त्यांचाही विचार होणार आहे. कोविडमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती संकटात आल्यानं पुढील काळात यावर योजना जाहीर करून अंमलबजावणी केली जाईल,” असंही नवाब मलिक यांनी नमूद केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments