Saturday, January 28, 2023
HomeGovt. schemeपैसे नसले तरी तुम्ही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे...

पैसे नसले तरी तुम्ही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे योजना…

किसानवाणी :
देशभरात कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून अनेकांचा रोजगार गेल्याचे पहायला मिळाले. नोकरी, व्यवसाय बुडाल्याने अनेकांवर उपासमारीचीही वेळ आली. तर नोकरी व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्य करणाऱ्या अनेकांना पुन्हा आपल्या गावची वाट धरावी लागली.

या कठिण काळात देखील सर्वांना शेती क्षेत्रानेच तारल्याने आता प्रत्येकाला आपल्या मालकीची शेतजमीन असावी असे वाटू लागले आहे. असे असले तरी मुळातच ग्रामीण भागातील प्रत्येकाला स्वतःची शेतजमीन नाही किंवा जरी असली तरी ती अगदीच अल्पक्षेत्र असणारी आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्याची इच्छा असली तरी अनेकदा पैशाअभावी देखील त्यांना जमीन खरेदीसाठी मोठी अडचण निर्माण होते. 

लहान आणि सिमांत शेतकऱ्यांची ही अडचण ध्यानात घेऊन स्टेट बॅंक ऑफ इंडियाने एक महत्वपूर्ण योजना आणली आहे. यामुळे हाती पैसा नसताना देखील जमीन खरेदी करून शेतजमीनीचे मालक होता येणार आहे. स्टेट बॅंकेने आणलेल्या या योजनेला ‘जमीन खरेदी योजना’ असे नाव दिले असून बॅंकेच्या वेबसाईटवर याची सविस्तर माहितीही देण्यात आलेली आहे. 

स्टेट बॅंकेने सुरू केलेल्या जमीन खरेदी योजनेचा उद्देश

SBI च्या जमीन खरेदी योजनेचा (Land Purchase Scheme) उद्देश हा आहे की, छोट्या शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे. किंवा ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही अशा शेतकऱ्यांना शेतीयोग्य जमीन खरेदीसाठी मदत करणे. या योजनेचा लाभ घेताना महत्वाची अट म्हणजे अर्जदारावर दुसऱ्या कोणत्याही बॅंकेचे कर्ज नसावे.  

जमीन खरेदी सोबत यासाठी मिळेल कर्ज

  1. जमीन खरेदी
  2. जमीन विकास, सिंचन विकास (जमिनीच्या एकूण किंमतीच्या ५० टक्के पेक्षा जास्त नसावी)
  3. शेती अवजारे खरेदी
  4. जमीन नोंदणी फी
  5. गहाण जमीन खरेदी करण्यासाठी
  6. कर्जाच्या रक्कमेवर ८५ टक्के कर्ज

योजनेसाठी पात्र शेतकरी

  1. लहान आणि अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे ५ एकरपेक्षा कमी कोरडवाहू शेती आणि २.५ एकरपेक्षा कमी सिंचित जमीन आहे.
  2. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती/शेतकऱ्याने मागील दोन वर्षापासून नियमित पणे कर्जाची परतफेड केलेली असावी.
  3. इतर बॅंकेत खाते असणाऱ्यांना या योजनेचा लाभ हवा असल्यास इतर बॅंकेतील कर्ज खाते बंद करावे लागेल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments