शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पाणंद रस्ते व शेतरस्त्यांवरील वाद मिटणार; मिळणार कायदेशीर मान्यता | Panand Roads

Panand Roads

किसानवाणी | महसूल विभागाने यावर्षी ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतात जाण्यासाठी आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या पाणंद रस्त्यांची (Panand Roads) निर्मिती व कायदेशीर वैधता निश्चित करण्यासाठी विभागाने विशेष मोहिम राबविण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबरच्या जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबरच्या जयंतीपर्यंत राबवल्या … Read more

मिनी ट्रॅक्टरसाठी 90 टक्क्यांपर्यत शासन अनुदान, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज | Mini Tractor Subsidy 2025

Mini Tractor Subsidy 2025

किसानवाणी (Mini Tractor Subsidy 2025) | अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या घटकांतील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत 9 ते 18 अश्वशक्ती क्षमतेचा मिनी ट्रॅक्टर तसेच कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर खरेदी … Read more

शेतकरी बंधूनो आता गुलाबी बोंडअळीचा खेळ खल्लास.. AI तंत्रज्ञान करणार मदत | Pink Bollworm Ai Control

किसानवाणी | राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत कापसावरील गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी यंदा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार असून लवकरच दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार होणार आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांत अंमलबजावणी … Read more

Monsoon 2025: माॅन्सूनचा पाऊस यंदाही चांगला बरसणार; विविध जागतिक हवामान केंद्रांचा अंदाज

किसानवाणी | देशात आतापासूनच २०२५ च्या मॉन्सून हंगामाबाबत (Monsoon 2025) चर्चा सुरू झाली असून, विविध जागतिक हवामान संस्थांनी सरासरी पावसाचे संकेत दिले आहेत. युरोपियन हवामान अंदाज केंद्र, दक्षिण कोरियाचे अपेक हवामान केंद्र, कोलंबिया विद्यापीठाचे आयआरआय केंद्र, जपानचा हवामान विभाग आणि युके हवामान विभागाने भारतात मॉन्सून समाधानकारक राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग … Read more

Tractor Subsidy Yojana : शेतकऱ्यांनो ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतंय 5 लाख रुपये, अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या सविस्तर

Tractor Subsidy Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने “कृषी यांत्रिकीकरण उपअभियान” योजना सुरू केली आहे. या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते. ज्यामुळे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणे शक्य झाले आहे. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 5 लाख रुपये पर्यंतचे अनुदान मिळू शकते. अनुदानाचे प्रमाण 40% … Read more

Shet Rasta Kayda : शेतात जायला रस्ता नसेल तर स्व:ताच्या हक्काचा शेतरस्ता कसा मिळवायचा? नियम आणि अर्ज प्रक्रिया,जाणून घ्या | Farm Road

किसानवाणी | शेतीमध्ये सगळ्या सोयी-सुविधा असल्या तरी रस्ता नसेल तर त्या शेताची किंमत आणि उपयोगिता दोन्ही कमी होतात. शेतकरी असो किंवा व्यापारी, शेतीमाल घरापर्यंत किंवा बाजारात पोहोचवण्यासाठी रस्ता हा अत्यंत गरजेचा असतो. मात्र, अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसतो. अशा वेळी ते ज्यांच्या शेतातून आपल्या शेतात येण्यासाठी रस्ता उपलब्ध होऊ शकतो अशा शेतकऱ्यांकडून रस्ता … Read more

Manikrao Kokate : राज्याच्या विद्यमान कृषिमंत्र्यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा; न्यायालयाचा निकाल

किसानवाणी | शेतकऱ्यांची अप्रत्यक्षरित्या भिकाऱ्यांशी तुलना करणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (ता. २०) कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यामुळे त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता असून मंत्रीपदही जाणार आहे. घर खरेदी प्रकरणात शिक्षा – Manikrao … Read more

भारतीय द्राक्षांसाठी न्यूझीलंडच्या बाजारपेठेचे दरवाजे उघडणार! Indian grapes will get a market in New Zealand

किसानवाणी | भारतीय द्राक्षांच्या निर्यातीसाठी न्यूझीलंडची बाजारपेठ (Indian grapes will get a market in New Zealand) खुली होण्याची शक्यता असून, यासाठी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. सध्या न्यूझीलंडचे शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. न्यूझीलंड आणि भारतीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (ता. १७) मुंबईतील ‘अपेडा’च्या कार्यालयात झाली. या बैठकीला ‘अपेडा’च्या … Read more

समुद्रमार्गे पहिल्यांदाच सोलापूरच्या डाळिंबाची ऑस्ट्रेलियात निर्यात; ३९ दिवसांच्या प्रवासानंतर यशस्वी विक्री | Pomegranate Export

किसानवाणी | सोलापूर जिल्ह्यातील उच्च दर्जाच्या भगव्या डाळिंबाची पहिल्यांदाच समुद्रमार्गे यशस्वी निर्यात (Pomegranate Export) ऑस्ट्रेलियात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ५.७ टन आणि दुसऱ्या टप्प्यात ६.५६ टन अशा एकूण १२.२६ टन डाळिंबाची निर्यात झाली. ३९ दिवसांचा प्रवास करत ही शिपमेंट अनुक्रमे ६ जानेवारीला ब्रिस्बेन आणि १३ जानेवारीला सिडनीला पोहोचली. अपेडाच्या पुढाकाराने अ‍ॅग्रोस्टार आणि के.बी. एक्स्पोर्ट्सच्या … Read more

Crop Damage Compensation :अतिवृष्टीचे १०२ कोटी रखडले; नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Crop Damage Compensation: गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतीच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. तब्बल १०२ कोटी रुपयांची मदत शासनाकडे रखडलेली असून, ती कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ५७,७५८.५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईसाठी ७९ कोटी ४४ लाख ३५ हजार ९०८ … Read more