कोल्हापूर जिल्ह्यात 5 ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरू

कोल्हापूर | जिल्ह्यात राज्य शासनाच्यावतीने आधारभूत किंमत धान खरेदी योजना हंगाम 2020-21 अंतर्गत 5 ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरू झाल्याची माहिती दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी दिली आहे.

चंदगड तालुका खरेदी-विक्री संघामार्फत तुर्केवाडी, चंदगड तालुका कृषीमाल फलोत्पादन अडकूर, आजरा किसान सह. भात खरेदी विक्री संघ मर्या.- आजरा, उदयगिरी शाहूवाडी तालुका सह. संघमार्फत -मलकापूर तसेच मार्केटींग फेडरेशनमार्फत गोकुळ- शिरगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू केली आहेत. ही खरेदी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्याकरिता प्रथम शेतकऱ्यांनी त्यांचा मूळ डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा प्रत, तसेच या सातबाऱ्यावर चालू खरीप हंगाम 2020 मधील धान पीक लागवडीची नोंद असणे आवश्यक असून सोबत आधार कार्ड व बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्सची आवश्यकता आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार नोंद झालेल्या शेतकऱ्यांची खरेदी करण्यात येईल व खरेदी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर खरेदीची रक्कम वर्ग करण्यात येईल.

माहितीकरिता संस्थेच्या कार्यालयाशी अथवा श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करावा.

Kisanwani: